Farmer ID: शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य! तो कसा, कुठे आणि का काढायचा? वाचा अधिकृत शासकीय नियम

मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद, पारदर्शक आणि थेट लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने ‘ॲग्रिस्टॅक’ (AgriStack) या डिजिटल उपक्रमांतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID / शेतकरी ओळखपत्र) अनिवार्य करण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल कृषी मिशन (Digital Agriculture Mission) अंतर्गत संपूर्ण देशात आतापर्यंत ८.४ कोटींपेक्षा जास्त फार्मर आयडी तयार करण्यात आले असून महाराष्ट्रातही ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
फार्मर आयडी Farmer ID म्हणजे नेमके काय?
ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची ओळख म्हणजेच ‘आधार कार्ड’ आहे, त्याचप्रमाणे आता शेतकरी असल्याची डिजिटल ओळख म्हणजे ‘फार्मर आयडी’ असणार आहे. हा एक ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ (Unique ID) असेल, जो शेतकऱ्याचा आधार क्रमांक, त्याचे बँक खाते आणि त्याच्या जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड (७/१२ आणि ८-अ) यांच्याशी थेट जोडला जाईल.
फार्मर आयडी ‘का’ काढायचा? (या योजनांचे लाभ मिळतील)
शासकीय योजनांमधील गैरप्रकार, बोगस लाभार्थी आणि मानवी चुका टाळण्यासाठी सरकारने हा Farmer ID बंधनकारक केला आहे. हा आयडी न काढल्यास शेतकऱ्यांना खालील मोठ्या योजनांपासून वंचित राहावे लागू शकते:
पीएम किसान व नमो शेतकरी योजना: नवीन नोंदणीसाठी आणि चालू हप्ते सुरळीत सुरू ठेवण्यासाठी फार्मर आयडी सक्तीचा केला जात आहे.
पीक विमा आणि कर्ज: पीक विमा (Crop Insurance), पीक कर्ज (Crop Loan) आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मिळणारी नुकसान भरपाई थेट या आयडीच्या आधारे दिली जाईल.
धान व शेतीमाल खरेदी: शासकीय केंद्रांवर शेतीमाल किंवा धान खरेदी तसेच त्यावर मिळणारा बोनस फार्मर आयडीशिवाय जमा होणार नाही.
कागदपत्रांची कटकट संपणार: एकदा फार्मर आयडी तयार झाल्यावर शेतकऱ्यांना वारंवार तलाठी कार्यालयात चक्रा मारण्याची किंवा प्रत्येक योजनेसाठी ७/१२ आणि ८-अ च्या झेरॉक्स जोडण्याची गरज पडणार नाही.
फार्मर आयडी ‘कुठे’ व ‘कसा’ काढायचा?
Farmer ID काढण्यासाठी सरकारने डिजिटल आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकरी बांधव खालील ठिकाणी जाऊन आपली नोंदणी करू शकतात:
१. अधिकृत पोर्टल: शेतकरी स्वतः mhfr.agristack.gov.in या अधिकृत शासकीय संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात.
२. महा ई-सेवा केंद्र: आपल्या गावातील आपले सरकार किंवा सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन हा आयडी काढता येईल.
३. शासकीय कार्यालय: गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी कार्यालयात संपर्क साधूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
आवश्यक कागदपत्रे: नोंदणीसाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी), जमिनीचा चालू ७/१२ उतारा किंवा ८-अ खाते उतारा, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
सावधान! खोटी माहिती दिल्यास ५ वर्षे आयडी होणार ‘ब्लॉक’
शासकीय नियमांनुसार,Farmer ID काढताना किंवा कोणत्याही योजनेसाठी अर्ज करताना जर एखाद्या शेतकऱ्याने चुकीची अथवा खोटी कागदपत्रे सादर केली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आयडी पुढील ५ वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल, ज्यामुळे त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Maharashtra Farmer ID Online Registration 2026, AgriStack Digital Farmer Identity Card Portal,How to Link Aadhaar with Farmer ID Maharashtra, Farmer ID Mandatory for PM Kisan and Crop Insurance,








