
Election News :कोरेगावच्या उत्तरेतील गावात लक्षवेधी लढत होणार
Election News पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, पिंपोडे खुर्द, नांदवळ खुला पुरुष तर कुमठे महिलांना संधी…..
रणजित लेंभे / विशेष प्रतिनिधी (पिंपोडे बुद्रुक)
Election News कोरेगाव तालुक्यात सरपंचपदाचे पुन्हा एकदा फेर आरक्षण काढण्यात आले. यामध्ये अनेक ठिकाणचे आरक्षण बदलल्यामुळे इच्छुकांची विकेट पडली आहे. या आरक्षणाने अनेकांचे आडाखे चुकले असून राजकीय गणिते विघडली आहेत. काही जणांना लॉटरी लागल्याने तालुक्यात “कही खुशी कही गमचे” चित्र आहे. तालुक्यावर महिलाराज राहणार असून, तालुक्यात ७१ महिला सरपंच होणार आहेत.पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, खेड,पेठ किन्हई, कन्हेरखेड, करंजखोप, चिमणगाव, नांदवळ, भक्तवडी आदी मोठ्या ग्रामपंचायती खुल्या, तर पाडळी स्टेशन (सातारारोड) नामाप्र महिला, एकंबे अनुसूचित जाती, कुमठे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.
Election News कोरेगाव तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आरक्षण सोडतीसाठी विविध गावचे ग्रामस्थ आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यात अनुसूचित जाती महिलांसाठी ७, अनुसूचित जाती खुला ६, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागासप्रवर्ग महिलांसाठी १९, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी १९ तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी ४५ आणि सर्वसाधारण खुला ४५ अशी आरक्षित पदे निश्चित करण्यात आली होती. तालुक्यातील अनपटवाडी, अनभुलेवाडी, अरबवाडी, आझादपूर (न्हावी खुर्द), आसनगाव, कण्हेरखेड, करंजखोप, काळोशी, कोलवडी, खामकरवाडी, खेड (नांदगिरी), गुजरवाडी (पळशी), चवणेश्वर, चिमणगाव, जरेवाडी, जांब खुर्द, तांबी, तारगाव, त्रिपुटी, धुमाळवाडी (नांदगिरी), नांदवळ, पिंपोडे खुर्द, पिंपोडे बुद्रुक, पेठ किन्हई, फडतरवाडी, बनवडी, बर्गेवाडी, बोधेवाडी (भाडळे), बोबडेवाडी, भक्तवडी, भाकरवाडी, भाटमवाडी, भावेनगर, भिवडी, राऊतवाडी, रुई, ल्हासुर्णे, वाठार स्टेशन, विखळे, शिरंबे, शेंदुरजणे, शेल्टी, सायगाव (धामणेर), हासेवाडी आणि हिवरे ही गावे खुली झाली आहेत.
अंधेरी, अपशिंगे, आसगाव, कठापूर, कवडेवाडी, किन्हई, कुमठे, खडखडवाडी, खिरखिंडी, चंचळी, चांदवडी, चोरगेवाडी, चौधरवाडी, जगतापवाडी, तांदूळवाडी, दरे तर्फतांब, दहिगाव, दुधी, दुधनवाडी, धामणेर, नलवडे वाडी (तारगाव), नायगाव, पवारवाडी, बिचुकले, बोधेवाडी (चिमणगाव), बोरीव, भंडारमाची, भाडळे, मध्वापुरवाडी, मुगाव, मोरर्वेद, मोहितेवाडी, रामोशीवाडी, रिकीबदारवाडी, वाघजाईवाडी, तडवळे संमत वाघोली, वाठार (किरोली), वेळू, शिरढोण, साठेवाडी, सायगाव (एकंबे), सासुर्वे, सुर्तीसुलतानवाडी, होलेवाडीत सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहेतअंबवडे संमत वाघोली, आसरे, किरोली, कोंबडवाडी, गुजरवाडी, (टकले), घाडगेबाडी, चिलेवाडी, जळगाव, टकले, नागझरी, नागेवाडी, निगडी, न्हाळेवाडी बेलेवाडी, चोरगाव, रणदुल्लाबाद, वाघोली, सोनके आणि सोळशीत ओबीसी आरक्षण पडले आहे. तर अंबवडे संमत कोरेगाव, एकसळ, जांब बुद्रुक, जायगाव, तळीये, देऊर, नलवडेवाडी (बिचुकले) नहावी बुद्रुक, परतबडी, पळशी, पाडळी स्टेशन, भीमनगर, भोसे, मंगळापूर, रेवडी, वडाचीवाडी, सर्कलबाडी, साप आणि सिद्धार्थनगरमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले आहे.
१३ ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आरक्षण
अनुसूचित जातीसाठी आर्वी, एकंबे, गोडसेवाडी, पिंपरी, बेलंग (कण्हेरखेड) वेलंग (शिरंवे) ही गावे राखीव झाली आहे. तर गोळेवाडी, पिगेवाडी, जाधववाडी, तडवळे संमत कोरेगाव, बोरजाईबाडी, दुर्गळवाडी आणि सांगवीत अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षण पडले आहे. तर गोगावलेवाडी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे.
पिंपोडे बुद्रुक जि.प. गटात खुल्या प्रवर्गातील अनेक गावांना लॉटरी….
फेर सोडती मध्ये पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील अनेक गावांना सर्वसाधारण पुरुष खुल्या वर्गातील इच्छुकांना लॉटरी लागली आहे. यामध्ये पिंपोडे बुद्रुक, करंजखोप, अनपटवाडी, आसनगाव, अरबवाडी, नांदवळ,चवनेश्वर, बनवडी,भावेनगर या गावांचा समावेश आहे. तर चौधरवाडी,दहिगाव, नायगाव, तडवळे स.वाघोली येथे खुल्या प्रवर्गातील महिलांना संधी मिळाली आहे.





