
धनंजयराव गाडगीळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड
सातारा: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँकिंग (banking) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांची आयडीबीआय बँकेच्या बँक एक्झिक्युटिव्ह व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड या कंपनीत आयबीपीएस भरती परीक्षेद्वारे ज्युनियर असिस्टंट म्हणून निवड झालेली आहे. बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे देशातील राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँका तसेच विविध शासकीय आणि निमशासकीय संस्थांमधील भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बँका व वित्तीय संस्था तसेच शासकीय स्थापना मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या केंद्रामार्फत केले जात असून या केंद्रातील संकेत सनस जोहेद पटेल व निकिता ढोणकर यांची आयडीबीआय बँक लिमिटेड मध्ये बँक एक्झिक्युटिव्ह पदी निवड झालेली असून आयबीपीएस द्वारे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड मध्ये ज्युनियर अकाउंटंट भरती परीक्षेसाठी घेतलेल्या परीक्षेमधून समाधान करे, निकिता जाधव, मयुरी भोसले, मोहित पवार व वैष्णवी घोरपडे यांची अंतिम निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत दळवी, सचिव श्री विकास देशमुख, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, कुलगुरू डॉ ज्ञानदेव मस्के, सहसचिव प्रि.डॉ. शिवलिंग मेंणकुदळे, सहसचिव प्रि.डॉ. राजेंद्र मोरे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश जाधव, बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. विजय कुंभार, उप-प्राचार्य डॉ टी. डी महानवर केंद्र समन्वयक सौ रोहिणी भोसले, ऑफिस सुप्रीटेंडेंट अशोक मसने यांनी अभिनंदन केले.
