लाडकी बहीण योजना बंद करणार नाही: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजना बंद करणार नाही: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन (Ladki Bahin Yojana)

यवतमाळ जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्यां महिलांना दिला शब्द

जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी उपक्रमात महिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

(Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजना हि आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर जगण्याचा आधार आहे असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगताच ही लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील २ ० घरकाम करणाऱ्या महिलांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी उपक्रमात झाली. रसिकाश्रय या संस्थेच्या पुढाकारातून हि भेट सह्याद्री अतिथीगृहावर घडवून आणण्यात आली . या भेटीमुळे महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, भांडी घासून कुटुंब कसे चालवायचं असा प्रश्न होता अशावेळी लाडकी बहिण योजनेमुळे आम्हांला मोठा आधार मिळाला, असे सांगताना एक वृद्ध महिलेला गहिवरून आले .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना समाजवून घेत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही यापेक्षा अधिकची मदत कशी करता येईल याचा विचार करतोय असा शब्द दिला. आम्ही कधी विमानात बसू असे वाटलं नव्हतं आज विमान प्रवास केला असेही एका महिलेने आवर्जून सांगितले. सन्माननिधी म्हणून मिळणारे १ ० हजार रूपये दरवर्षी मिळावेत असेही महिलांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत शासन पातळीवर या मागणीचा विचार करू असे सांगितले व ज्या वृद्ध महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना सन्माननिधीचा लाभ देण्यासाठी आश्वस्त केले. Ladki Bahin Yojana

Prabhukrupa Automobiles

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)