Shambhuraj Desai Satara घेवडा पीक विम्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार :- पालकमंत्री शंभूराजे देसाई

Shambhuraj Desai Satara घेवडा पीक विम्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार :- पालकमंत्री शंभूराजे देसाई

पावसाने ओढ दिल्याने घेवडा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; वाठार स्टेशन, तडवळे संमत वाघोली येथे पालकमंत्र्यांची पाहणी

वाठार स्टेशन, दि. २४ (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई Shambhuraj Desai Satara यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज वाठार स्टेशन व तडवळे संमत वाघोली परिसराचा धावता दौरा केला. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे घेवड्याचे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले असून, फक्त २५ ते ३० टक्केच उत्पन्न निघत असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर घेवडा पिकाचा पीक विम्यात समावेश व्हावा, यासाठी जिल्ह्याच्या वतीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

वाठार स्टेशन परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेवड्याचे पीक घेतले आहे. यंदाच्या हंगामात घेवड्याचे पीक फुलकळी अवस्थेत असतानाच पावसाने मोठी ओढ दिली. त्यामुळे पिकाची वाढ खुंटून उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हातातून गेल्याने त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधनच संकटात आले आहे.

घेवड्याच्या उत्पादनावर शेतकऱ्यांनी बँका व पतसंस्थांकडून घेतलेली कर्जे, हातउसने घेतलेली रक्कम तसेच आगामी दिवाळीचा खर्च भागविण्याचे नियोजन केले होते. मात्र, पिकाचे नुकसान झाल्याने कर्जफेडीसह दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाठार स्टेशन तसेच तडवळे संमत वाघोली परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी घेवडा पिकाच्या नुकसानीबाबत पालकमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडली. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची दखल घेऊन घेवडा पिकाचा पीक विम्यामध्ये समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

घेवडा पिकाला पीक विम्याचे संरक्षण मिळाल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या आश्वासनाकडे परिसरातील घेवडा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या दौऱ्यावेळी संजीवराजे निंबाळकर,माजी आमदार दीपक चव्हाण, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, वाठार स्टेशनच्या मंडलाधिकारी रेश्मा चव्हाण, तलाठी सचिन माळी, कृषीअधिकारी ज्ञानदेव जाधव, मुंगळे, कृषी पर्यवेक्षक महेश नलावडे, नागेश जाधव, माजी पंचायत समिती उपसभापती संजय साळुंखे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके,अजित भोईटे,अविनाश फडतरे,ज्ञानेश्वर लोंढे, इरफान पठाण,मंगेश शितोळे, गणेश चव्हाण, अनिल माने,राजेश काळोखे,रणजीत सरकाळे, विकास मतकर,सचिन लोंढे,राहुल जाधव, महसूल सेवक मोहसीन पठाण, हणमंत तावरे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

फोटो ओळ : – वाठार स्टेशन येथे घेवडा पिकाची पाहणी करताना पालकमंत्री शंभूराज देसाई,सोबत माजी आमदार दीपक चव्हाण.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू