Ayushman Card Online Apply 2026: आता घरबसल्या मोफत मिळवा ५ लाखांपर्यंतचे उपचार! WhatsApp वरून ‘आयुष्मान कार्ड’ काढण्याची सर्वात सोपी पद्धत; जाणून घ्या पात्रता अन् प्रक्रिया

मुंबई | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Ayushman Card Online Apply 2026 केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)’ अंतर्गत देशातील करोडो नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचारांची (Cashless Healthcare) सुविधा पुरवली जाते. सामान्य कुटुंबांना आजारपणाच्या मोठ्या खर्चापासून दिलासा देणारी ही योजना आता अधिक डिजिटल आणि सोपी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरनाने (NHA) आयुष्मान कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पोर्टलसोबतच आता WhatsApp Chatbot (आयुष्मान सारथी) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही महा-ई-सेवा केंद्रात न जाता थेट मोबाईलवरून ५ मिनिटांत कार्ड काढता येणार आहे.
आयुष्मान कार्डसाठी पात्रता निकष
केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. ७० वर्षे पूर्ण केलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांचे मोफत आरोग्य कवच दिले जाते. एखाद्या वरिष्ठ नागरिकाकडे आधीच खाजगी हेल्थ इन्शुरन्स असला तरीही ते या योजनेसाठी पात्र ठरतात. तसेच ७० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी सामाजिक, आर्थिक व जात जनगणना (SECC) २०११ च्या आकडेवारीनुसार ग्रामीण व शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आणि सरकारने निश्चित केलेल्या प्राधान्य गटातील कुटुंबे यासाठी पात्र मानली जातात.
अधिकृत पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
Ayushman Card Online Apply 2026 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी beneficiary.nha.gov.in या अधिकृत शासकीय वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तेथे ‘Beneficiary’ हा पर्याय निवडून आपला मोबाईल नंबर टाकावा व प्राप्त झालेला OTP टाकून लॉगिन करावे. त्यानंतर स्क्रीनवर PM-JAY योजना निवडून आपले राज्य आणि जिल्हा सेलेक्ट करावा. पुढे आपले नाव, रेशन कार्ड नंबर किंवा ओळख क्रमांक टाकून यादीतील रेकॉर्ड शोधावा. नाव आढळल्यास आवश्यक ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करून फोटो अपलोड करावा व अर्ज सबमिट करावा. पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे डिजिटल आयुष्मान कार्ड सहज डाऊनलोड करता येते.
WhatsApp वरून ५ मिनिटांत कार्ड बनवण्याची सोपी पद्धत
सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्मान सारथी’ व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे आता कार्ड काढणे अधिक सुलभ झाले आहे. यासाठी सर्व प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये अधिकृत व्हॉट्सॲप नंबर +91 72908 23838 सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सॲपवर जाऊन या नंबरवर ‘Hi’ किंवा ‘Hello’ असा मेसेज पाठवावा. मेसेज पाठवल्यानंतर मिळालेल्या पर्यायांमधून Choose Service > My Ayushman Card > Apply for PMJAY Card या क्रमांकावर क्लिक करावे. पुढे आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ओळख माहिती टाकून ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करावी. प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे आयुष्मान कार्ड थेट व्हॉट्सॲपवर पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड करता येईल. ज्यांच्याकडे आधीपासून कार्ड आहे, ते या व्हॉट्सॲप चॅटबॉटवरून ई-केवायसी अपडेट करणे, ओळख माहिती लिंक करणे किंवा कार्ड अनलॉक व डाऊनलोड करणे अशा सुविधांचाही लाभ घेऊ शकतात.











