Ladki Bahin Yojana: कोणत्याही क्षणी खात्यात ₹१५०० जमा होणार! मे महिन्याचा कितवा हप्ता आणि योजना कधी सुरू झाली? वाचा सविस्तर अपडेट

Ladki Bahin Yojana: कोणत्याही क्षणी खात्यात ₹१५०० जमा होणार! मे महिन्याचा कितवा हप्ता आणि योजना कधी सुरू झाली? वाचा सविस्तर अपडेट

मुंबई/प्रतिनिधी

महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने Ladki Bahin Yojana’चा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार, याकडे लागलेल्या डोळ्यांना अखेर दिलासा मिळाला असून राज्य सरकारने यासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा मे महिन्याचा हप्ता, येत्या दोन दिवसात म्हणजे १५ किंवा १६ जूनला पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार मोनिका राजळे यांनीही याबाबत सूतोवाच केले आहे.

मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४५ कोटींचा निधी मंजूर!

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल ३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजप आमदार मोनिका राजाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राजकीय सूत्रांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, येत्या १२ ते १५ जून दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात Ladki Bahin Yojana हप्त्याची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

योजना कधी सुरू झाली?

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेची Ladki Bahin Yojana सुरुवात केली होती. या योजनेला अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर १ जुलै २०२४ पासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात पहिला हप्ता वर्ग करण्यात आला होता.

मे महिन्याचा हा कितवा हप्ता आहे?

ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू झाल्यापासून महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. वर्ष २०२४ मधील ६ हप्ते आणि वर्ष २०२५ मधील १२ हप्ते यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. त्यानुसार, आता जून २०२६ मध्ये मिळणारा हा मे महिन्याचा हप्ता या योजनेचा एकूण ‘२३ वा हप्ता’ आहे.

‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे; आमदारांनी केली घोषणा!

भाजपच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे (MLA Monica Rajale) यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अत्यंत महत्त्वाची अधिकृत माहिती जाहीर केली आहे. मोनिका राजळे यांनी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ ते १५ जून दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत महिलांच्या मोबाईलवर पैशांचे मेसेज पडण्यास सुरुवात होईल.

‘या’ १ गोष्टीशिवाय खात्यात पैसे येणार नाहीत (e-KYC बंधनकारक)

Ladki Bahin Yojana निधी मंजूर झाला असला आणि पैसे येण्यास सुरुवात होणार असली, तरी जर तुमची ई-केवायसी (e-KYC) प्रोसेस अपूर्ण असेल, तर तुमचे पैसे अडकू शकतात. सुरुवातीला अनेक महिलांनी अर्ज भरले, पण त्यामध्ये काही त्रुटी होत्या. सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांनी आपली ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केलेली नाही, त्यांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असूनही जर तुमच्या खात्यात पैसे हवे असतील, तर बँक खात्याची ई-केवायसी प्रोसेस पूर्ण झाली आहे की नाही, हे पुन्हा एकदा नक्की तपासून घ्या. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Ladki Bahin Yojana May Installment Update 2026, Mazi Ladki Bahin Yojana 1500 Rupees Date, Maharashtra Govt Approved 344 Crore Ladki Bahin, Ladki Bahin Yojana eKYC Mandatory Notification, MLA Monika Rajale Statement Ladki Bahin Yojana,

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू