Pandharpur Wari देऊर-पंढरपूर अधिकमास पायी दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान

Pandharpur Wari ग्यानबा- तुकारामच्या जयघोष आणि टाळ मृदूंगाच्या गजर, अधिकमासानिमित्त पायी दिंडीसोहळ्याचे आयोजन
प्रकाश राजे-कोरेगाव
देऊर (ता.कोरेगाव ) येथून अधिकमासानिमित क्षेत्र पंढरपूर अधिकमास पायी दिंडीचे पंढरीकडे Pandharpur Wari आयोजन करण्यात येते यंदाही अधिकमास सुरु झाल्यावर देऊर-पंढरपूर अधिकमास पायी दिंडीचे पंढरीकडे भक्तिभावात प्रस्थान केले. ग्यानबा- तुकारामच्या जयघोष आणि टाळ मृदूंगाच्या गजर करीत भाविक- वारकरी यांची पावले पंढरीकडे चालू लागली असून देऊरकरांनी या दिंडी सोहळ्याला भक्तिभावात निरोप दिला.
अधिक मासानिमित्त गावातील माऊली प्रासादिक मंडळ यांच्या नियोजनातून देऊर ते पंढरपूर पायी वारी करण्यात येत आहे. चालू वर्षी या वारीचे सातवे वर्ष असून, गावातील ग्रामस्थ व महिलांचा मोठा सहभाग या वारीत आहे. बुधवारी सकाळी गावातील पुरातन असलेल्या विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पादुकांचे पूजन करून माऊलींचा रथ पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. सकाळी १० वाजता अंबवडे येथील जंगली महाराज मठाचे मठाधिपती ब्रह्मानंद महाराज यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. मोहन नाना कदम, ह.भ.प. हिंदुराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी देऊरमधील ग्रामस्थांनी यात सहाभाग घेत वेशीपर्यंत दिंडीला साथ देत भक्तीबाहेर निरोप दिला.
सकाळी १० वाजता ही पायी दिंडी गावातून मार्गस्थ झाली. सलग आठ दिवस या दिंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देऊर – वाठार स्टेशन- आदर्की- फलटण – नातेपुते- सदाशिवनगर- वेळापूर- वाखरी- पंढरपूर असा या दिंडीसोहळ्याचा प्रवास असणार आहे. मागील अधिक मास वारीनंतर गावात मोठा सांप्रदायिक बदल घडला असून, युवकांचे मोठया प्रमाणावर या वारीसाठी मोठे योगदान मिळत आहे. त्यामुळे यंदाही या दिंडीच्या सहभागी युवकांची संख्या मोठी आहे.
२८ मे रोजी ही दिंडी परतीचा प्रवास करून देऊरला येणार आहे.












