Donald Trump News खळबळजनक: वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार; हल्लेखोर अटकेत,

Donald Trump News खळबळजनक: वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार; हल्लेखोर अटकेत,

“The Show Must Go On!” – गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया Donald Trump News

वॉशिंग्टन डीसी: Donald Trump News अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. वॉशिंग्टन डीसीमधील प्रसिद्ध ‘हिल्टन हॉटेल’मध्ये ‘व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर’ सुरू असताना हा थरार घडला. बॉलरूमच्या वरच्या मजल्यावरून झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली असून, ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलवले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प दाम्पत्य डिनरसाठी हॉटेलमध्ये दाखल झाले होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला. हल्लेखोराने बॉलरूमच्या अगदी वरच्या मजल्यावरून गोळीबार केला. सीक्रेट सर्व्हिसने क्षणार्धात हालचाल करत ट्रम्प यांना वेढा घातला आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

कोण आहे हल्लेखोर?

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव कोल टॉमस अलन (३१) असे आहे. त्याच्याबद्दल समोर आलेली माहिती धक्कादायक आहे, शिक्षण तो एक उच्चशिक्षित तरुण असून, त्याने २०१७ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्समध्ये त्याने मास्टर्स केले आहे. व्यवसाय तो शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर म्हणून काम करतो. विशेष म्हणजे, ‘सी-२ एज्युकेशन’मध्ये त्याला ‘डिसेंबर २०२४ चा सर्वोत्तम शिक्षक’ पुरस्कार मिळाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही आणि अशा कृत्यांचा कडक निषेध व्हायला हवा.”

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यांची मालिका

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पेन्सिल्व्हेनिया (जुलै २०२४) एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्या कानाला गोळी लागली होती. त्यावेळी हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रुक्स याला जागीच ठार करण्यात आले होते. दुसऱ्यांदा फ्लोरिडा (सप्टेंबर २०२४) मध्ये ट्रम्प गोल्फ खेळत असताना रायन वेस्ली रुथ नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर रायफल रोखली होती, मात्र सीक्रेट सर्व्हिसने तो कट उधळून लावला होता.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?

हाय-प्रोफाईल ‘व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर’सारख्या कार्यक्रमात, जिथे कडक सुरक्षा असते, तिथे हल्लेखोर वरच्या मजल्यापर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सीक्रेट सर्व्हिसने संपूर्ण हॉटेल सील केले असून कोल टॉमस अॅलनची कसून चौकशी सुरू आहे.

678751955 122173476566723345 8934749353905803328 n

“The Show Must Go On!” – गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

हल्ल्याच्या थरारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे सुरक्षा यंत्रणांचे आभार मानले आणि आपली जिद्द बोलून दाखवली. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की:

“वॉशिंग्टन डीसीमध्ये आजची संध्याकाळ खूपच धक्कादायक होती. सीक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा दलांनी अप्रतिम काम केले आहे. त्यांनी अत्यंत वेगाने आणि धैर्याने पावले उचलली. हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. मी ‘कार्यक्रम सुरूच ठेवा’ (Let the show go on) अशी सूचना केली होती, पण आता सर्व काही सुरक्षा यंत्रणांच्या निर्णयावर अवलंबून असेल. काहीही झाले तरी आजची संध्याकाळ नियोजित वेळेपेक्षा वेगळी असेल आणि आपल्याला हे पुन्हा नव्याने करावे लागेल.”डोनाल्ड जे. ट्रम्प

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू