Goa News चलो गोवा.. ४ मे रोजी डिजिटल मिडिया संघटनेचे महाअधिवेशन गोवा येथे होणार

Goa News चलो गोवा.. ४ मे रोजी डिजिटल मिडिया संघटनेचे महाअधिवेशन गोवा येथे होणार

Goa News राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी स्थळाची केली पाहणी

पणजी /प्रतिनिधी

Goa News डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. यावेळी गोवा अधिवेशन कोअर कमिटीची बैठक कला अकादमीच्या कार्यालयात पार पडली यावेळी संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के, यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले, गोवा येथे होणारे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची सर्व टीम अत्यंत नियोजनबद्ध काम करीत असून देशभरातील हजारो संपादक पत्रकार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी या अधिवेशनासाठी अधिकृत नाव नोंदणी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आपापल्या जिल्हाध्यक्ष यांचेकडे करावी.यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, “गोवा राज्याला ऐतिहासिक व पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गोवा येथे होणारे अधिवेशन अधिक दर्जेदार व सर्वांच्या ज्ञानात भर पडणारे असे होईल यासाठी आम्ही सर्व आपल्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत.”

lagnaustav.com
lagnaustav.com

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026)