Bavdhan bagad Yatra बावधनच्या बगाड यात्रेचा मानकरी ठरला, होळी पौर्णिमेला झाला श्रींचा कौल

दरवर्षी रंगपंचमीला भरते Bavdhan bagad Yatra, राज्यभरातील भाविकांचे आकर्षण
Bavdhan bagad Yatra सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावची बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. रंगपंचमी दिवशी या बगाड यात्रेचा मुख्य दिवस असतो आणि हि बगाड मिरवणूक पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक या दिवशी बावधन गावाला भेट देतात. या यात्रेला बगाडाचा मान हा दरवर्षी परंपरेप्रमाणे श्री काशिनाथ देवाला कौल लावून ठरवला जातो. होळी पौर्णिमेच्या मध्यरात्री हा कौल लावला जातो.
यावर्षीही होळी पौर्णिमेला रात्री बारा वाजताच बावधन नगरीत एक अनोखा थरारक आणि अत्यंत भावनिक क्षण साकारतो कौल नवसाच्या बगाड्याची निवड झाली यावर्षीचा बगाड्याचा मान श्री विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला. यावेळी बावधन च्या श्री काळभैरवनाथ मंदिरात मध्यरात्री सर्व बावधनकर भक्तगण एकत्र जमले वातावरणात दैवी शांततामय वातावरणात नाथांना कौल लावला जातो.
ज्यांनी ज्यांनी नाथांना नवस केलेला असतो, ते सर्व भाविक देवासमोर ओळीने कौलासाठी बसतात. देवांचे पुजारी प्रत्येक नवसकर्त्याच्या नावाने नाथांना कौल लावतात. प्रत्येकाच्या नावाचा पुकारा होतो आणि क्षणभर संपूर्ण परिसरात शांतता पसरते.देवांचा कौल मिळताच काशीनाथाचे चांगभले!” या जयघोषाने आसमंत दुमदुमतो. नाथांचा उजवा प्रसाद ज्याला लाभतो, त्याची त्या वर्षीच्या बगाड्या म्हणून निवड केली जाते. हा मान म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर श्री नाथांच्या कृपेची आणि श्रद्धेची पावतीच असते.
यावर्षीचा बगाड्याचा मान श्री विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला असून त्यांनी सुमारे १६ वर्षापूर्वी सन २०१० साली बंधू श्री रविंद्र सोपान कदम आजारी असल्याने त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी श्री नाथांना नवस केला होता तो नवस पूर्णत्वास गेला. त्यानंतर २०१३ पासून ते देवाचा कौल घेत आहेत यावर्षी त्यांना कौल मिळाला आणि त्यांना निवड बगाड्या होण्याचा मान मिळाला. त्यांचे बंधुनाही देवाचा बगाड्या होण्याचा मान मिळाला होता. आता विठ्ठल सोपान कदम यांनाही हा मान मिळाल्याने कदम परिवाराने समाधान व्यक्त केले.
आता ८ एप्रिल रोजी काशिनाथाच्या नावाने चांगभलंच्या गजरात Bavdhan bagad Yatra बगाड यात्रा होणार आहे. त्यासाठीची तयारीने वेग घेतला असून यानिमित्ताने अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम बावधनमध्ये आयोजित होतात.





