Social Media Ban In Nepal
Social Media Ban In Nepal व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्ससह 26 समाजमाध्यमांवर बंदी
Social Media Ban In Nepal आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, १८ जण ठार, अनेक जखमी
Social Media Ban In Nepal नेपाळ सरकारने २६ सोशल मीडिया साईटवर बंदी घातल्यानंतर तरुणाई या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरली असून सरकारच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक रूप मिळाले, नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात संताप उसळला आहे आंदोलनकर्त्यांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला असून आंदोलनकर्त्यांवर सुरक्षा दलांनी अश्रूधुर व नंतर गोळीबार केला यात 18 जण ठार, अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सरकारनं व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्ससह 26 समाजमाध्यमांवर बंदी घातल्यानंतर तरुणांनी मोठं आंदोलन छेडलं आहे
बंदीची पार्श्वभूमी नेमकी काय
2024 मध्ये नेपाळ सरकारनं समाजमाध्यमांना करकक्षेत आणण्याची मागणी केली होती. सरकारच्या या मागणीला या सोशल माध्यमांनी प्रतिसाद दिला नाही. यामध्ये व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स यासारख्या जगभरात नावलौकिक व दबदबा असलेल्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे वारंवार अल्टिमेटम देऊनही या कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. Social Media Ban In Nepal
आंदोलनाचा घटनाक्रम काय
नेपाळ सरकारने २६ सोशल मीडिया साईटवर बंदी घातल्यानंतर तरुणाई या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरली व सरकारच्या या निर्णयाला प्रचंड विरोध सुरु केला लाखोंची गर्दी या आंदोलनात उतरली. तरुणाईने सरकारच्या धोरणांचा कडाडून विरोध केला असून आंदोलनकर्त्यांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुरक्षा रक्षक, लष्कर आणि आंदोलनकर्ते यांच्यात धुमश्चक्री सुरु आहे. सुरक्षा दलांनी अश्रूधुर व नंतर गोळीबार केला यामध्ये 18 जण ठार, अनेक जखमी झाल्याचे वृत्त मिळत आहे, परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी काठमांडूच्या बानेश्वर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्कर तैनात करण्यात आले आहे. Social Media Ban In Nepal
राजकीय हालचालीना वेग
नेपाळ सरकारने सोशल मीडिया साईटवर आणलेली बंदी आणि याविरोधात रस्त्यावर उतरलेली तरुणाई यामुळे नेपाळमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नेपाळ सरकारविरोधात नेपाळी जनतेचा रोष वाढत आहे जनतेने विशेषतः तरुणाईने आंदोलन तीव्र, सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अशावेळी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपत्कालीन बैठक बोलावली असून संध्याकाळी मंत्रिमंडळ व राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित केली गेली यात पुढील दिशानिर्देश स्पष्ट होणार आहेत.
दक्षिण आशियात शेजारी देशात अस्थिरता
नेपाळ मधील परिस्थिती बिकट व तणावपूर्ण बनली आहे लाखो तरुण रस्त्यावर सरकारविरोधात आंदोलनात उतरलेले आहेत यापूर्वी विविध कारणांनी श्रीलंका आणि बांगलादेश मध्येही जनतेने उठाव करीत थेट संसेदवर व राष्ट्र्पती निवासावर आंदोलन करीत सरकार उलथवले होते आता नेपाळहि त्याच मार्गाने जात असल्याने शेजारी म्हणून भारत याकडे काळजीपूर्वक नजर ठेवून आहे.
#Social Media Ban In Nepal #NepalNews #SocialMediaBan
