Koregaon Rastaroko
BIG NEWS : दररोज अपघाताची मालिका, ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
Koregaon Rastaroko Big News कोरेगाव तालुक्यातील दोस्ती ढाबा ते कोरेगाव या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून गेली आठ महिन्यापासून या रस्त्याचं केवळ 5 टक्के काम झाले आहे ठेकेदाराने हा संपूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने या मार्गावर सर्व प्रकारची व हातूक विस्कळीत झाली आहे शालेय विद्यार्थ्याचे एस टी अभावी नुकसान होत आहे तर अश्या रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होऊन 40 ते 50 लोकांचे हातपाय मोडले आहेत याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली आहे.यावेळी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी नसल्याने भीक मांगो आंदोलन करण्यात आले
देऊर कोरेगाव रहिमतपूर रस्त्याच काम ज्या पध्दतीने करणे अपेक्षीत होत त्यानुसार झालं नाही इंडियन काँग्रेस रोड नियमाप्रमाणे हे काम होण अपेक्षित होत मात्र त्यानुसार हे काम झालं नाही या रस्त्याचे काम सुरू असल्याचे कुठेही फलक लावण्यात आले नाहीत याशिवाय हा रस्ता 144 कोटी रुपयांचा असताना 572 कोटी चे बोर्ड लावून जनतेची दिशाभूल करण्याचे काम होत आहे या बाबत msidc चे प्रोजेक्ट मॅनेजर निखिल राऊत यांना यावेळी चांगले धारेवर धरण्यात आले त्यांनी हे काम 144 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितल्यावर उपस्थित लोकांनी मग येथील आमदारांनी 572 कोटी चे बोर्ड कसे लावले यावर मोठा खल झाला.
यावेळी महाविकास आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तेजस शशिकांत शिंदे,साहिल शशीकांत शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे,राष्ट्रीय काँग्रेस चे नाहीम इनामदार,शिवसेना उबाठा गटाचे दिनेश बर्गे,माकप चे शिवाजी नलवडे,निलेश जगदाळे,निलेश कदम,नाना भिलारे, ॲड पी.सी.भोसले, ॲड अमोल राशीनकर, पै.नितीन लवंगारे, सचिन पोळ,देऊर माजी उपसरपंच सोपान कदम ,राजेद्र कदम, बाळासाहेब कदम,गजानन मोरे, किशोर नानासो बर्गे,रेवडी सरपंच भोसले,ग्रामस्थ उपस्थित होते.
या आंदोलन वेळी दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी या रस्त्यावरील वहातूक अर्धा तास ठप्प झाली होती. आंदोलनं स्थळावर वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
