
Kaichi Dham
Kaichi Dham भंडाऱ्याचे आयोजन, तीन लाख भाविक दाखल होणार
नैनीताल, उत्तराखंड नजीक असलेल्या कैंची धामचा Kaichi Dham स्थापना दिन दरवर्षी १५ जून रोजी साजरा केला जातो. १५ जून रोजी कैंची धाम येथे भरणाऱ्या मेळ्याला नीम करोली बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कैंची धामची स्थापना स्वतः बाबा नीब करोरी महाराजांनी केली होती. यामुळे या मंदिराला विशेष महत्व असून यावर्षीही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून जगभरातून सुमारे तीन लाख भाविक कैची धामला दर्शनासाठी येतील अशी शक्यता आहे.
१५ जून रोजी कैंची मेळा Kaichi Dham भरणार आहे
दरवर्षी १५ जून रोजी कैंची धाम येथे भव्य मेळा भरतो. कैंची धामच्या स्थापनेनिमित्त हा मेळा भरतो. या दिवशी कैंची धाम स्थापना दिन साजरा केला जातो. जून १९६४ मध्ये भावली येथे कैंची धामची स्थापना झाली. असे म्हटले जाते की नीम करौली बाबा १९६२ मध्ये कैंची गावातील पूर्णानंद यांना भेटले आणि सोंबारी महाराजांचे निवासस्थान पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सोंबारी महाराजांची यज्ञशाळा सापडली आणि साफसफाई केल्यानंतर तेथे एक व्यासपीठ बांधण्यात आले. या व्यासपीठावर हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली. आणि १५ जून रोजी मूर्तींचे अभिषेक करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी १५ जून रोजी कैंची धाम येथे मेळा भरतो. हनुमानजींचे अवतार मानले जाणारे नीम करोली महाराज यांचे १९७३ मध्ये वृंदावनात निधन झाले. तर त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर गावात झाला. त्यांचे बालपणीचे नाव लक्ष्मी नारायण शर्मा होते. जे पुढे Neem Karoli Baba Kaichi Dham नीम करोली बाबा या नावाने जगप्रसिद्ध झाले.
Kaichi Dham परिसर आणि मंदिर सजले रोषणाईने
मंदिराला आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले असून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक लोक उत्साहाने मेळ्याच्या व्यवस्थापनात सहभागी होतात. कैंची धाम येथे सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते आणि बाबांना ब्लँकेट अर्पण केले जाते. कैंची धाममध्ये नीम करोली बाबांचा महिमा देशभर आणि परदेशात पसरला आहे. अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, विराट कोहली यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनीही कैंची धामला भेट दिली आहे. हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल. त्यामुळे केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील लोकांचे लक्ष या स्थळाकडे वेधले गेले आहे. बाबांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नाही असे मानले जाते. या विशेष दिवशी सकाळी धार्मिक विधी, हवन आणि संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आश्रमात सजावट, भंडारा आणि प्रसाद वाटपाचे कार्यक्रम दिवसभर सुरु होते.
प्रशासनाची तयारी जोरात.. वाहतुकीत बदल
यावर्षी मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून Kaichi Dham ६१ व्या स्थापना दिनाची तयारी जोरात सुरू आहे. स्थापना दिनानिमित्त देश-विदेशातून येणारे भाविक मंदिरात सहज पोहोचू शकतात. त्यामुळे प्रशासनाने १४ जून रोजी सकाळी ८ ते १५ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत भवली कैंची धाम मार्ग वळवला आहे. नैनीतालचे एसपी सिटी डॉ. जगदीश चंद्र म्हणाले की, १४ जून रोजी सकाळी ८ ते १५ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत भवली कैंची धाम मार्गावर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. काठगोदाम ज्योलिकोटहून येणारी वाहने भवली रामगड नथुवाखानमार्गे क्वाराब येथे पाठवण्यात आली आहेत. तर हल्द्वानीहून भिमतालकडे येणारी वाहने खुटानी धनचुलीमार्गे अल्मोडा येथे पाठवण्यात येतील. यासोबतच, अल्मोडाहून येणारी वाहने कुराब नथुवाखान रामगड भवलीमार्गे हल्द्वानी येथे पाठवण्यात येतील. त्यांनी सांगितले की, १४ जूनपासून आवश्यक वाहने वगळता इतर सर्व वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल.
कैंची मेळ्यात मालपुआ चा प्रसाद असतो विशेष
Kaichi Dham येथे होणाऱ्या मेळ्यात येणाऱ्या मोठ्या संख्येने भक्तांना मालपुआचा प्रसाद दिला जातो. खरंतर असे मानले जाते की नीम करोली बाबांना मालपुआ खूप आवडायचा. म्हणून या दिवशी मालपुआ प्रसाद म्हणून वाटला जातो. यंदा तीन लाख भाविक या दिवशी हजेरी लावतील असा अंदाज असून प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.यावेळी, कैंची धाम मंदिराच्या स्थापनेनिमित्त दिला जाणारा मालपुआचा प्रसाद तीन दिवसांसाठी उपलब्ध असेल. एडीएम विवेक राय म्हणाले की, दरवर्षी १५ जून रोजी स्थापना दिनानिमित्त भाविकांना मालपुआचा प्रसाद वाटला जातो. परंतु यावेळी भाविकांना १६ आणि १७ जून रोजी मालपुआचा प्रसाद मिळेल. जेणेकरून कोणत्याही भक्ताला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.
