School News :घिगेवाडीत बाल चिमुकल्यांनी भरवला आठवडी बाजार

School News :घिगेवाडीत बाल चिमुकल्यांनी भरवला आठवडी बाजार

ग्रामस्थांनी घेतला उस्फुर्त सहभाग School News

घिगेवाडी (ता. कोरेगाव) येथील School News जिल्हा परिषद शाळेतील बाल चिमुकल्या विद्यार्थी यांनी आगळावेगळा असा आठवडा बाजार भरवला. शाळेच्या पटांगणात शाळेच्या वतीने भरविण्यात उद्घाटन श्री.गजानन सावंत-जमादार(निवृत्त)-पोलीस रेल्वे महामार्ग वाहतूक मुंबई यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थित झाले,ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.
शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला बाल बाजार “फुड फेस्टिव्हल-भाजी मंडई ” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासात तर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे.त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे.
या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या पालेभाजी, चायनीज भेळ, ईडली,मंचुरियन,विविध प्रकारच्या डाळी,घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ,खाद्यपदार्थांमध्ये पॅटीस,भेल सेंटर,वडापाव,पाणीपुरी,भजी-चहा,अशा दुकानांचा यात समावेश होता. ग्रामस्थांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची खरेदी व विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,हा उत्साह पाहून ग्रामस्थ,पालक,महिला बचत गटांच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन व चिकित्सक वृत्ती वाढीस लागते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते.या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.यातून विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाची व आर्थिक उलाढालीची आपसूक ओळख होण्यास मदत होईल यात मात्र शंका नाही अशा प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत,मुख्याध्यापक नाथाजी रूपनवर सर,आदिनाथ सावंत मा.उपसरपंच यांनी आपली मनोगतं मांडली.
यावेळी धनसिंग सावंत(चेअरमन),अनिल घिगे,अजित सावंत,रोहित सावंत,रवी सावंत,छाया घिगे,प्रशांत सावंत,लक्ष्मण सावंत,अर्चना सावंत,श्रीमंत घिगे,निलेश सावंत,चंद्रभागा साळुंखे,प्रतिक सावंत,सुभाष सावंत,धनसिंग भोसले,सोपान सावंत,तेजस घिगे,प्रशांत घिगे,पांडुरंग साळुंखे,सुधीर सावंत,अमोल सावंत, सुनिता घिगे,कल्पना सावंत,मनीषा धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)