FOOD TECHONLOGY: हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे उज्ज्वल यशाची हमी – संग्राम सुभाष पाटील

FOOD TECHONLOGY: हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे उज्ज्वल यशाची हमी  – संग्राम सुभाष पाटील

FOOD TECHONLOGY: सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट कार्यशाळा

कराड : FOOD TECHONLOGY जगभरात अनेक क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध होत असताना त्यापैकी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करणे म्हणजे उज्वल यशाची हमी आहे कारण खाद्यसंस्कृती मानवी जीवनाचा आणि जगण्याचा समृद्ध अनुभव आहे त्यामळे या खाण्यासंबंधी माणूस अधिक चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळे या क्षेत्रात खऱ्या अर्थाने लोकांचे जगणे समृद्ध करण्याची आनंद मिळतो अशा विश्वास प्रा . संग्राम पाटील यांनी व्यक्त केला.

सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘नोकरी आणि व्यवसायाच्या संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सातारा येथील धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे सहाय्यक प्राध्यापक संग्राम पाटील, यावेळी ते मार्गदर्शन करीत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते.

यावेळी श्री. पाटील यांनी FOOD TECHONLOGY हॉटेल व्यवस्थापनातील विविध करिअर संधींचा व भविष्यातील विस्ताराचा समग्र परिचय करून दिला. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उपप्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख डॉ. संदीप व्ही. महामुनी यांनी केले. कार्यशाळेसाठी सीमा खटावकर, स्वप्नील चव्हाण, गणेश पाटील, वैभव जगताप व विद्यार्थी उपस्थित होते.

netsoft computer
netsoft computer

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू