घिगेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

घिगेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

पिंपोडे बुद्रुक,दि.२१

घिगेवाडी ता.कोरेगाव येथे ग्रामपंचायत आणि आधार सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्यावतीने आयुर्वेद उपचार आणि आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देता यावी व त्याचे आरोग्यमान सुधारावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मान, पाठ, गुडघे, कंबर, ब्लडप्रेशर, शुगर, मुतखडा, थॉयराईड, स्किन व मूळव्याध या आजारा संदर्भात,निरोगी जीवन समृद्ध जीवन म्हणजेच आयुर्वेद या उक्ती प्रमाणे उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य सल्लागार डॉ.साजिद शेख,आकाश फडतरे, पंडित पाटील यांनी माहिती दिली.
यावेळी सरपंच नारायण सावंत, उपसरपंच तेजस्विनी भोसले, आदिनाथ सावंत,लक्ष्मण सावंत,अर्चना सावंत,निलेश सावंत, अशोक घिगे,चंद्रभागा साळुंखे,संगिता घिगे,शांता सावंत, रोहित सावंत, धनसिंग सावंत,गजानन सावंत,बेबी साळुंखे, प्रल्हाद सावंत,पोपट साळुंखे, मिथुन बर्गे,रविंद्र घिगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

IMG 20250122 WA0012

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026)