ZP Election
ZP Election वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात थंडीमध्ये राजकीय वातावरण तापले
शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे अंबवडे चौकात उदघाटन ZP Election
संदीप पवार/ पळशी : ZP Election वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात ओबीसी आरक्षण असताना या ठिकाणी कुणबी दाखल्यांच्या आधारावर राजकीय अतिक्रमण करुन स्वार्थ साधत असेल आणि या समाजावर कोणी अन्याय करणार असेल तर अशा धनदांडग्या आणि उपरया उमेदवाराला जशास तसे उत्तर देऊन माघारी पाठवण्यासाठी लढणार व्यवस्था देण्याची वेळ येऊ देऊ नका असा संतप्त सवाल व्यक्त करत या गटात ओबीसी उमेदवार असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा समाज ठाम राहील असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बापू कदम यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या वाठार स्टेशन गटामध्ये अद्यापही आमदार महेश शिंदे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी योग्य उमेदवार ठरले नसल्यामुळे ऐन थंडीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवार दिनांक १८ रोजी अंबवडे संमत वाघोली येथे आमदार महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काटकर यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचा फित कापून शुभारंभ करण्यात आला.
अंबवडे संमत वाघोली येथे शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय काटकर,उप तालुका प्रमुख चंद्रकात पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.अभय तावरे,बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार,ज्येष्ठ नेते बबनराव भिलारे,तानाजी गोळे,मनोज गाढवे,विलास पवार,तानाजी जाधव, डॉ,शिवाजी माने यांच्या सह जिल्हा परिषद, पंचायत समिती गटातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन गणासाठी उमेदवार ठरले नसल्याबाबत जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली मते व प्रतिक्रिया मांडल्या. वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटामध्ये प्रामुख्याने ओबीसी कॅटेगिरी मधील उमेदवारालाच उमेदवारी मिळाली पाहिजे असे सर्वांचे मत झाले आहे. या जिल्हा परिषद गटात उपरा उमेदवार नको. त्याचबरोबर कुणबी जातीचा दाखला घेऊन कोण येत असेल तर त्याला जनता धडा शिकवेल.
काही उमेदवारांनी तर या मतदारसंघात प्रचाराला जोरदारपणे सुरुवात केलेली आहे. असे असताना शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा गटाचा व दोन्ही गणाचा उमेदवार ठरला नसल्यामुळे या भागातील प्रमुख नेते व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. आज अंबवडे संमत वाघोली येथे या गटातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भव्य पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघात उमेदवार लादला तर काय निर्णय घ्यायचा याबद्दलही झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ओबीसी समाजातील योग्य उमेदवारास आमचा पाठिंबा राहील असे मराठा समाजातील उपस्थित नेते मंडळींनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठे आणि अठरा पगड जाती आनंदाने व गुण्यागोविंदाने राहत होते असे वातावरण सध्या पाहिजे. मराठा व ओबीसी समाजात कोणतीही तेढ व जातीयवाद असता कामा नये ही आमची भूमिका आहे. या गटातील सर्व नेतेमंडळी, प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिकांनी सलोख्याने वागून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जशी जवळ येत आहे तसे या गटातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. आज झालेले शक्तिप्रदर्शन आणि पदयात्रा ही एक झलक असून दिलेला इशारा आहे असे मत काहींनी व्यक्त केले.
यावेळी अंबवडे, रेवडी, भक्तवडी, तांबी, पिंपोडे खुर्द, तडवळे, वाठार स्टेशन, देऊर, विखळे, जाधव वाडी, फडतरवाडी, तळीये, नलवडेवाडी, बिचुकले, गुजरवाडी, पळशी, कोलवडी, आंबवडे संमत कोरेगाव, खडकडवाडी येथील सरपंच, सदस्य, प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा Mobile Tips तुमचा फोन स्लो झालाय? वेग वाढवण्यासाठी करा हे उपाय






