Youngest Indian mountaineerधैर्या कुलकर्णीची अद्भुत कामगिरी – १३ व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलोमंजारो आणि माऊंट एलब्रुस सर

Youngest Indian mountaineerधैर्या कुलकर्णीची अद्भुत कामगिरी – १३ व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलोमंजारो आणि माऊंट एलब्रुस सर

Youngest Indian mountaineer एव्हरेस्ट बेस कॅम्प, Everest Base Camp आफ्रिकेतील सर्वात उंच किलोमंजारो पर्वत आणि युरोपमधील माऊंट एलब्रुस ही शिखरे जगभरातील गिर्यारोहकांसाठी मोठं आव्हान मानली जातात. ही तिन्ही अवघड शिखरे अवघ्या १३ वर्षीय धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने सर करून दाखवली आहेत.

साताऱ्यातील धैर्या हिने उणे १४ अंश सेल्सिअस तापमानात तब्बल ५,६४२ मीटर उंचीचं माऊंट एलब्रुस सर करत इतिहास रचला. एवढ्या कमी वयात अशी थरारक शिखरं सर करणाऱ्या धैर्या कुलकर्णीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि साताऱ्याचा अभिमान उंचावला आहे.

साताऱ्याची १३ वर्षांची मुलगी जिंकतेय जगातील शिखरे!

साताऱ्याची माती नेहमीच कर्तृत्ववान व्यक्तींना जन्म देते. अशाच मातीतील एक चमकता तारा म्हणजे धैर्या कुलकर्णी. वय केवळ १३ वर्षे; पण कामगिरी पर्वताएवढी! धैर्याने अलीकडेच युरोप खंड व रशिया सीमेवरील माऊंट एलब्रुस (Mount Elbrus) शिखर यशस्वीरित्या सर केले. समुद्रसपाटीपासून तब्बल ५,६४१ मीटर (१८,५१० फूट) उंचीचे हे शिखर दोन मृत ज्वालामुखींनी बनलेले असून, ते गिर्यारोहकांसाठी एक मोठे आव्हान मानले जाते.

माऊंट एलब्रुस सर करण्याचा प्रवास

  • पहिल्या दिवशी: मिनरली ओडी गावात मुक्काम.
  • दुसऱ्या दिवशी: आजाऊ गावातून ३,००० मीटर उंचीची चढाई.
  • तिसऱ्या दिवशी: बेस कॅम्प (Mountan Hunt) गाठला.
  • चौथ्या दिवशी: ४,६०० ते ४,८०० मीटर उंची सर.
  • पाचव्या दिवशी: थंडी व बर्फाच्या प्रचंड आव्हानांना तोंड देत माऊंट एलब्रुस शिखरावर भारतीय तिरंगा फडकावला.

प्रवासादरम्यान तापमान -१४ अंश सेल्सिअस होते. सर्वत्र बर्फाच बर्फ. या दिव्य आव्हानावर मात करून धैर्याने साताऱ्याचे व भारताचे नाव अभिमानाने उंचावले.

एव्हरेस्ट बेस कॅम्पचा विक्रम

धैर्याने याआधी एप्रिल २०२४ मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,५४५ मीटर) मोहिम पूर्ण केली होती. अवघ्या १२ व्या वर्षी, पालकांशिवाय हा कॅम्प पूर्ण करणारी ती भारतातील पहिली मुलगी ठरली. मायनस १० डिग्री तापमानात १४ दिवसांत तिने तब्बल १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

किलीमंजारोचे शिखरही केले सर

धैर्याने आफ्रिका खंडातील किलीमंजारो शिखर (५,८५० मीटर) देखील यशस्वीरित्या सर केले आहे. बर्फ, थंडी, ऑक्सिजनची कमतरता, रात्रीचा प्रवास अशा कठीण परिस्थितीतही तिने हे शिखर जिंकले. हे शिखर सर करणारी ती भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक मुलगी ठरली आहे.

धैर्याचा सराव : अजिंक्यताऱ्यापासून एव्हरेस्टपर्यंत

धैर्याचा सकाळी साडेतीन वाजता सुरू होणारा सराव म्हणजे तिच्या जिद्दीचे दर्शन. अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, सांबरवाडी सुळका, जरंडेश्वरचा डोंगर – ही तिच्या ट्रेकिंगची ठिकाणे. पायात वजन बांधून केलेला तिचा सराव भविष्यात आणखी मोठ्या मोहिमा गाठण्याचे संकेत देतो.

कुटुंब व मार्गदर्शन

धैर्या ही साताऱ्याचे ज्येष्ठ बँकर व समाजसेवक विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांची कन्या. तिला गिर्यारोहक प्रियंका मोहितेकैलास बागल यांचे मार्गदर्शन मिळते. सध्या ती गुरुकुल स्कूल, सातारा येथे आठवीत शिकते

पालकांशिवाय उंचवतेय ‘मान’

१२-१३ वर्षांची मुले पालकांच्या मागे-पुढेच करताना दिसत असतात. काही करायचे म्हटले की सोबत पालक हवेतच. मात्र, धैर्याने तिन्हीही शिखर आई-वडिलांशिवाय सर केली आहेत. स्वप्नवत भरारी घेण्यासाठी इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी, धैर्य आदींचे बळ सोबत घेवून ती सर्वांची मान उंचावणारी कामगिरी करत आहेत. धैर्याने वयाच्या १२ वर्षी आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले होते. ते शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली. त्यानंतर आता तिन्हे माऊंट एलब्रुस शिखर सर केले.

अजिंक्यतारा ते एलब्रुस… व्हाया एव्हरेस्ट

धैर्याची कामगिरी म्हणजे ‘एव्हरेस्ट‘सारखीच. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर चढाई करणारी धैर्या आता जगातील सर्वात मोठमोठी शिखरे सर करु लागली आहे. तिचा सराव म्हणजे तिच्यातील ‘धैर्या’ला समाल करावा, असाच आहे. सकाळी साडेतीन- चार वाजता तिचा सराव सुरु होतो. अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, सांबरवाडी सुळका, जानाई-मळाई डोंगर, जरंडेश्वरचा डोंगर ही तिची ट्रेकींगची ठिकाणे.पायात किलो-किलोची वजन बांधून तिचा सुरु असलेला सराव तिची जिद्द, मेहनतीचे दर्शन घडवतो.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)