Xiaomi 17 Pro Max review in Marathi
Xiaomi 17 Pro Max – दमदार प्रोसेसर, दुहेरी डिस्प्ले आणि Leica कॅमेरा | किंमत व संपूर्ण माहिती
Xiaomi 17 Pro Max स्मार्टफोन बाजारात दर महिन्याला नवं नवीन मॉडेल्स येत असतात, पण काही फोन हे खऱ्या अर्थाने “गेमचेंजर” ठरतात. गेल्या आठवड्यात Apple कंपनीने नवा iPhone 17 series बाजारात लॉन्च केल्यानंतर तो खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा अँपल स्टोर बाहेर लागल्याचे चित्र दिसले आता Xiaomi 17 Pro Max हा तसाच एक प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. दमदार प्रोसेसर, दुहेरी डिस्प्ले, जबरदस्त कॅमेरे आणि मोठी बॅटरी यामुळे हा फोन चर्चेत आला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती.
भारतीय बाजार पेठेत सध्या नवरात्री, दसरा आणि नंतर दीपावली असा सण उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे यामध्ये बाजारपेठेत तेजी पाहायला मिळते अशावेळी या उत्सवी पर्वात अनेक कंपन्या नवीन उत्पादने लॉन्च करीत असतात तसेच ऑफरही प्रसिद्ध करीत असतात. Xiaomi ने आपला नवीन 17 Pro Max हा बाजारात चीनमध्ये लॉन्च केला असून भारतात तो कधी येईल याचा खुलासा केला नाही, मात्र फेब्रुवारी पर्यंत तो भारतात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे, टेकप्रमी याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Xiaomi 17 Pro Max Marathi
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 हा नवा आणि शक्तिशाली प्रोसेसर दिला आहे. गेमिंग, मल्टीटास्किंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा AI टूल्स वापरणे – प्रत्येक गोष्टीसाठी हा प्रोसेसर वेगवान आहे. यासोबत HyperOS 3 (Android 16 वर आधारित) दिले असल्याने फोनचे UI आधुनिक आणि स्मूथ वाटते.
डिस्प्ले – दुहेरी आकर्षण
- मुख्य डिस्प्ले: 6.9 इंचाचा LTPO AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट आणि Dragon Crystal Glass संरक्षण.
- दुसरा डिस्प्ले: कॅमेरा मॉड्यूलच्या मागे छोटासा स्क्रीन देण्यात आला आहे. यात नोटिफिकेशन, म्युझिक कंट्रोल, सेल्फी प्रीव्ह्यू यांसारख्या सुविधा मिळतात.
हा दुहेरी डिस्प्ले Xiaomi 17 Pro Max ला इतर फ्लॅगशिपपेक्षा वेगळं ठरवतो.
कॅमेरा – प्रोफेशनल दर्जा
फोनमध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप दिला आहे:
- मुख्य कॅमेरा (OIS सपोर्टसह)
- अल्ट्रा-वाइड लेन्स
- 5x ऑप्टिकल झूमसह पेरिस्कोप टेलिफोटो
याशिवाय 50MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. Leica ट्यूनिंगमुळे फोटोमध्ये रंगछटा आणि डिटेल्स उत्कृष्ट मिळतात.
बॅटरी आणि चार्जिंग
- 7,500 mAh बॅटरी
- 100W फास्ट चार्जिंग
- 50W वायरलेस चार्जिंग
- 22.5W रिव्हर्स चार्जिंग
- मोठी बॅटरी आणि दमदार चार्जिंग सपोर्टमुळे दिवसभर फोन वापरण्यात अडचण येत नाही.
डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी
Xiaomi 17 Pro Max चे डिझाईन प्रीमियम आहे. IP68 रेटिंगमुळे हा फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. ब्लॅक, व्हाईट, ग्रीन आणि पर्पल असे रंग पर्याय उपलब्ध आहेत.
किंमत आणि उपलब्धता
सध्या हा फोन चीनमध्ये लॉन्च झाला असून 12GB RAM + 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत ₹74,700 (सुमारे) ठेवण्यात आली आहे. भारतात लॉन्च होण्याची तारीख अजून निश्चित नाही, पण लवकरच तो भारतीय बाजारात दिसेल अशी शक्यता आहे.
फायदे
दमदार प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
दुहेरी डिस्प्ले – एक वेगळेपण
ट्रिपल 50MP कॅमेरा + Leica ट्यूनिंग
7,500 mAh बॅटरी + 100W फास्ट चार्जिंग
प्रीमियम बिल्ड व IP68 रेटिंग
तोटे
वजन थोडे जड (219g)
किंमत जास्त
भारतात उपलब्धतेबाबत अजून स्पष्टता नाही
निष्कर्ष
Xiaomi 17 Pro Max हा फोन टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचे सुंदर मिश्रण आहे. दुहेरी डिस्प्ले, Leica कॅमेरा, प्रचंड बॅटरी आणि वेगवान चार्जिंग यामुळे तो फ्लॅगशिप कॅटेगरीत स्पर्धकांना टक्कर देऊ शकतो. प्रीमियम किंमत असूनही, पॉवर युजर, फोटोग्राफर आणि टेकप्रेमींना हा फोन नक्कीच आकर्षित करेल. Xiaomi 17 Pro Max review in Marathi






