Vastu Expert वास्तूतज्ञ प्रमोद गुरव शिवशंभू ज्योतिषभूषण पुरस्काराने सन्मानित

Vastu Expert वास्तूतज्ञ प्रमोद गुरव शिवशंभू ज्योतिषभूषण पुरस्काराने सन्मानित

एकसळ येथील अमर गणेश मंडळ व सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठानने केला कार्याचा गौरव

सासुर्वे (ता. कोरेगाव) येथील Vastu Expert वास्तूतज्ञ प्रमोद गुरव यांना शिवशंभू पुरस्कार जाहीर झाला आहे. एकसळ येथील अमर गणेश मंडळ व सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठान यांच्यामार्फत हा मानाचा पुरस्कार दिला जातो.

ज्योतिष व वास्तू क्षेत्रात उल्लेखनीय केलेले कार्य व या माध्यमातून लोकांच्या जीवनात दिलेले बहुमोल योगदान याबद्दल वास्तूतज्ञ प्रमोद गुरव यांना यंदाचा शिवशंभु ज्योतिष भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार प्रवीण महाराज शेलार यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी प्राचार्य एम बी भोसले, मोहनराव भोसले, प्रशांत भोसले, संजय पिसाळ, विठ्ठल भोसले, बापूसाहेब भोसले, भीमराव भोसले, हणमंत जगताप, पांडुरंग भोसले, अशोक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्योतिष व वास्तू क्षेत्रात उल्लेखनीय केलेले कार्य व या माध्यमातून लोकांच्या जीवनात दिलेले बहुमोल योगदान याबद्दल वास्तूतज्ञ प्रमोद गुरव यांना यंदाचा शिवशंभु ज्योतिष भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Vastu Expert प्रमोद विनायक गुरव हे ज्योतिष विशारद आणि वास्तू एक्सपर्ट असून अध्यात्मिक ईश्वरीय विश्व विद्यालय फरूखाबाद उत्तर प्रदेश इयत्ता 7 वी मध्ये असल्या पासून संस्थेचे विद्यार्थी आहेत वास्तुशास्त्र मध्ये 1999 पासून काम करत आहे. 22 हजार वास्तूच्या परीक्षण याचा अनुभव आहे. भाईजी या नावाने सर्वत्र परिचित आहे. जुन्या नव्या घरांचा, शाळा, कॉलेजेस, दवाखाना, फॅक्टरी, इंडस्ट्रियल, मंदिरे, गोडाउन्स, ऑफिसेस, प्लांट, प्रोजेक्ट यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. लोकांना अचूक वास्तू मार्गदर्शन करुन देणे हीच खरी कमाई या तत्वाने अव्याहतपणे कार्य केले. लोकांच्या हृदयात स्थान मिळवल्याचा आनंद मिळाला. लोकांच्याकडून भरपूर शिकता आले. सेवा करीत असताना लोकांनी भरभरून प्रेम दिले त्याची उतराई होऊ शकत नाही.

12 वी पर्यंतच शिक्षण सायन्स मधून घेतले. इंग्लिश विषयात पदवी घेतली. आजोबा शंकर हरी गुरव यांच्या कडून प्रेरणा मिळाली. आजोबा प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते त्यांचा ज्ञानाचा वारसा ते पुढे चालवीत आहेत, त्यांचे वडील विनायक शंकर गुरव हे उत्तम पुरोहित व शेतकरी होते. लोकांचे अनंत उपकार आहेत सर्वांनी नेहमी मदत केल्याची कृतज्ञता मनात कायम आहे. शास्त्रात आणखी संशोधन करण्याचा विचार आहे. त्या दिशेने अभ्यास करतो आहे. तसेच समाजासाठी गोर गरीब गरजू लोकांच्या करता तळमळ आहे आणि खूप काम करायचे इच्छा आहे.
शिवशंभु पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026)