नुकत्याच पार पडलेल्या सह्याद्री बँकेच्या निवडणुकीत अमितजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री परिवार पॅनलने १३/० या मोठ्या फरकाने विजय मिळवला .त्याबद्दल पॅनलचे प्रमुख मा.अमितजी चव्हाण यांचा सत्कार जलमंदिर पॅलेस येथे करण्यात आला.
सह्याद्री परिवार पॅनलचे प्रमुख अमितजी चव्हाण यांनी जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांची भेट घेतली त्यावेळेस बँकेच्या सध्याच्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यात आली ,यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी येणाऱ्या काळात अमितजी चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ खात्यात काम केल्यामुळे त्यांना बँकिंग विषयी माहिती आहे यामुळे यांच्या नेतृत्वाखाली बँक गतवैभव प्राप्त करेल,सर्वसामान्य हातगाडी कामगार व माथाडी कामगारांचे वैभव असणारी बँक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे काम अमित चव्हाण यांच्यामार्फत होईल असा विश्वास व्यक्त केला व सर्व नूतन संचालक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपल्या सातारा जिल्ह्याची मुंबईतली ओळख असलेली बँक म्हणून सह्याद्री बँकेचा उल्लेख होतो त्या बँकच्या हितासाठी कठोर निर्णय घेऊन ,त्या बँकेच्या ठेवी व सभासद सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आश्वासन अमितजी चव्हाण यांनी दिले.
यावेळी भाजपचे सातारा जिल्हा समन्वयक सुनीलतात्या काटकर, मा.जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ शिंदे, कुलदीप क्षीरसागर, बँकेचे संचालक बाळासाहेब देशमुख ,कुमार भोईटे व मान्यवर उपस्थित होते.