Sport News शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत विजेते ठरलेले स्व. शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली संघाचे खेळाडू व मान्यवर.
सातारा जिल्ह्याला प्रथमच ऐतिहासिक विजेतेपद,
स्व. शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली संघाची क्रीडा क्षेत्रात कामगिरी
रणजित लेंभे/ प्रतिनिधी
sport news शिवाजी विद्यापीठ, shivaji-university कोल्हापूर आयोजित आंतरविभागीय पुरुष हॅण्डबॉल स्पर्धेत सातारा जिल्ह्याने प्रथमच क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक विजेतेपद पटकावत क्रीडाक्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्व. शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली संघाने अंतिम सामन्यात सांगली जिल्ह्यातील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर संघाचा पराभव करत हा मान मिळवला.
shivaji-university शिवाजी विद्यापीठ संलग्न शंकरराव जगताप आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वाघोली यांच्या वतीने पिंपोडे बुद्रुक येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला होता.
थरारक अंतिम सामन्यात वाघोली (सातारा) संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, वेगवान आक्रमण व भक्कम बचावाच्या जोरावर रामानंदनगर (सांगली) संघावर 19-13 असा सहा गोलांनी दणदणीत विजय मिळवला. तृतीय क्रमांक शहाजी छत्रपती कॉलेज, कोल्हापूर तर चतुर्थ क्रमांक अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकलंगले यांनी पटकावला.
Sport स्पर्धेचे उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. सुनिताताई जगताप होत्या.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, सह्याद्री बँकेचे अध्यक्ष रामबाबा चव्हाण, सरपंच दीपिका लेंभे, भीमराव पाटील, दत्तात्रय महाजन, अशोकराव लेंभे, उपसरपंच रंजीत लेंभे, अमोल निकम, सरपंच नारायण सावंत, मुख्याध्यापक मारुती साळुंखे, सचिन लेंभे,संदीप कदम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप जाधव उपस्थित होते.
खासदार नितीन पाटील यांनी “क्रीडावृत्ती, शिस्त आणि संघभावना जोपासण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत उपयुक्त आहेत,” असे मत व्यक्त केले.
विजेत्या संघातील खेळाडू-सागर पवार (कर्णधार), हेमंत धोतरे, गौरव जाधव, शिवेंद्र नेवसे, कुणाल पिसाळ, गणेश जाधव, प्रणव जगताप, ओम बाबर, सुमित जगदाळे, दीपराज बाबर, प्रशिक्षक व मार्गदर्शक साहिल इनामदार, सुरज जाधव स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
डॉ. प्रताप जाधव, सचिन लेंभे, अमित वाघांबरे, विक्रम निकम, गणेश निकम, शिवाजी जाधव, प्रमोद निकम, सुमित पोतेकर, शाहनवाज सय्यद, सचिन कुदळे, आशुतोष साळुंखे, आझाद इनामदार आदींनी विशेष परिश्रम घेतले. पंच म्हणून संतोष पाटील, आकाश चौघुले, शुभम इंदलकर, सुशांत साळवी, सचिन लेंभे, अमित वाघांबरे, साहिल इनामदार, आशुतोष साळुंखे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घाडगे यांनी तर आभार प्रा. वैराट यांनी मानले. अंतिम सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी, आजी-माजी खेळाडू आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गर्दी केली होती.
sports news
स्पर्धेची वैशिष्ट्ये—-
सातारा जिल्ह्याला प्रथमच ऐतिहासिक विजेतेपद.
संयोजकांचे उत्कृष्ट मैदान नियोजन,
खेळाडू व मार्गदर्शकांसाठी उत्तम निवास व भोजन व्यवस्था
प्रथम चार संघांना आकर्षक चषकांचे वितरण








