Satara Big News
Satara Big News कोरेगावच्या उत्तरेत दादा गटात ‘इनकमिंग’ जोरात,
Satara Big News फलटण- कोरेगाव मतदरसंघातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेतील गावामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात इनकमिंग जोरात सुरु झाले असून घिगेवाडी येथील लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत व सहकार्यांनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश केला.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे फलटण कोरेगाव मतदरसंघातील उत्तर कोरेगाव येथील नांदवळ आणि घिगेवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच वि का स सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश करीत शरद पवार गटाला रामराम केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर याची प्रमुख उपस्थिती होती .
या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या भागात अजितदादा गट अधिक बळकट होत असल्याचे चित्र तयार झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता आता गावखेड्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाळेमुळे घट्ट असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातून मोर्चेबांधणीला वेग येणार आहे अशावेळी या भागात आज झालेलं पक्षप्रवेश महत्वाचे मानले जात आहेत.
घिगेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण सावंत, माजी सरपंच आदिनाथ सावंत, वि.का.स सेवा सोसायटीचे चेअरमन धनसिंग सावंत, व्हा.चेअरमन भरत घिगे, लक्ष्मण सावंत, नांदवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा बेस्के, उपसरपंच सचिन पवार, ज्येष्ठ नेते प्रकाश आप्पा शिंदे, सदस्य प्रकाश रासकर, राहूल ठोंबरे, संगिता भोसले, जयश्री भोसले, पुष्पा पवार, सूर्यकांत पवार,विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पवार, संचालक दत्तात्रय बबन पवार, रघुनाथ, पवार, अभिमन्यू भोसले तसेच उपसरपंच व सदस्यांनी आमदार सचिन पाटील व बाळासाहेब सोळसकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.




