Sahitya Sammelan: दिल्लीतील साहित्य संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

Sahitya Sammelan: दिल्लीतील साहित्य संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

मराठी भाषा मंत्री उदय सामंत केली साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी

Sahitya Sammelan: दिल्लीतील साहित्य संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. त्या निमित्ताने आज मराठी भाषा मंत्री श्री सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉक्टर शैलेश पगारिया तसेच त्यांचा चमू यावेळी उपस्थित होता.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहे. तर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आले. तसेच सभागृह क्रमांक एकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव, तर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण त्यांचे नाव देण्यात येणार आहे. व्यासपीठाला स्व. काकासाहेब गाडगीळ आणि स्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. जवळपास 4000 व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे अशी माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष ट्रेन दिल्ली येथे 19 तारखेला सुटणार आहे या ट्रेनमध्येही साहित्यिक विषयक परिसंवाद तसेच कवी संमेलन चे आयोजन होणार असल्याची माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना दिले. साहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणाऱ्या नियोजन कसे असणारे याचीही माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना दिली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)