Thackeray Brand
पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारकडून मागे घेण्यात आल्यानंतर मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मराठी जनतेच्या एकजुटीपुढे पुढे सरकार झुकले अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करीत आता ठाकरे बंधूंचा मोर्चा नाही तर विजयी मेळावा होणार असल्याचे सुचवाच केले असून मुंबईत या पाच जुलै च्या विजय मेळाव्यासाठी जागा शोधण्याचे काम आहे.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता या निर्णयाच्या विरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला होता. यामुळे राज्यात गेल्या महिन्याभरापासून मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद उभा राहिला होता या निर्णयाचे विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला होता तर शिवसेना ही विरोधाच्या मैदानात आक्रमक झाली होती.
दरम्यान ठाकरे बंधूंच्या दोन्ही संघटनांनी एकत्र येत पाच जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता दरम्यान या मोर्चापूर्वीच राज्य सरकारने हिंदी भाषा विषयीचे दोन जीआर रद्द करून पहिलीपासून हिंदीचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले त्यामुळे ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार नाही की नाही याबाबत चर्चा होत्या मात्र आता मोर्चा नाही तर ५ जुलै ला विजयी मेळावा होणार असे राज ठाकरे यांनीच स्पष्ट केले.
मराठी माणसाच्या शक्ती पुढे सरकारची सक्ती हरली असून मराठी माणूस पक्षभेद विसरून एक झाला सरकारचा डाव उधळवला. मराठी माणसाची एकजुट फोडायची, एक होऊ नये सरकार प्रयत्न करते, ते उघड झाले त्यामुळे ५ जुलै ला मराठी माणसाचा विजय साजरा होणार. अशी Udhhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
निर्णयानंतर Raj Thackeray म्हणाले, हिंदी सक्ती मागे घेतली हा मराठी माणसाचा विजय असून सरकारकडून असले प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाहीत असेही राज ठाकरे यांनी खडसावून सांगितले. या विजयी मेळावा मराठी माणसाचा असून या मेळाव्याला कोणतेही पक्षीय लेबल असणार नाही. असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
त्यामुळे मराठी भाषेच्या मुद्यावर ठाकरे बंधुचा आता ५ जुलैला मोर्चा नव्हे तर विजयी मेळावा होणार हे स्पष्ट झाले.






