Rain News पुराचा वेढा, त्यांनी जीव धोक्यात घालून दिली सेवा

Rain News पुराचा वेढा, त्यांनी जीव धोक्यात घालून दिली सेवा

Rain News कोल्हापुरात मुसळधार, पुराच्या पाण्यात वीजसेवेसाठी कामगिरी

Rain News चंदगड पार्ले सबस्टेशनच्या वीज कर्मचाऱ्यांची केली कामगिरी फत्ते MSEB चा स्टाफ म्हटले की आयुष्यभर फक्त आणी फक्त लोकांच्या शिव्याच ऐकाव्या लागतात. कितीही मेहनत करा, समर्पित वृत्तीने काम करा, लाईट गेली, वीज गेली की MSEB च्या नावाने शिव्यांची लाखोली वाहायला लोकांना क्षुल्लक कारण पण पुरेसे असते. याच मानसिकतेला छेद देण्याचे काम काल महावितरणच्या चंदगड तालुक्यातील पार्ले सबस्टेशन मधील स्टाफने केले आहे व वीज सेवा देणारे कर्मचारी संकटात नेहमीच लोकांच्या सेवेला पुढे असतात यांचे उदाहरण समोर आले.

Rain News कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मिसळधार पाऊस सुरु आहे. त्यात पश्चिमकडील चंदगड तालुक्यात तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील महावितरणच्या चंदगड पार्ले सबस्टेशन क्षेत्रातील कळसगादे, पार्ले, गुळंब, तिलारीनगर, कोदाळी, मोटणवाडी, झेंडेवाडी या गावातील वीज गेल्या आठ दिवसापासून खंडित होत होती. याभागाला वीज लाईन पूर्णपणे कोलमडून पडली होती.

Rain News कळसगादे पंचक्रोशीतील जवळपास सर्वच गावे मुसळधार पाऊस व तुफानी वाऱ्यांमुळे पोल पडल्यामुळे जवळपास आठवडाभर अंधारात होती. अशावेळी प्रतिकूल परिस्थितीत गेली आठवडाभर महावितरणचा स्टाफ मुसळधार पावसात लाईट आणण्यासाठी व वीज सप्लाय नॉर्मल करण्यासाठी झटत होता.

जीवाची पर्वा न करता छातीएवढ्या पाण्यात पावसाने तुडुंब Rain News भरलेल्या नदी नाल्यात दोरीच्या सहाय्याने धोका पत्करून काम स्टाफ काम करत होता. त्यांच्या प्रयत्नाला शेवटी यश आले. सर्व लाईन्स, पाण्यात पडलेले पोल उभे करून, कंडक्टर, क्रॉस आर्म, इन्सुलेटर्स, फ्युजेस सर्व तपासून त्याची पुनर्बांधणी करून स्टाफने ही मोहीम फत्ते केली.

Rain News गेले आठवडाभर जराही उसंत न घेता अहोरात्र, मुसळधार पावसात, पुराच्या वाहत्या पाण्यात उभं राहून येथील वीज कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर या भागाची सेवा पूर्ववत केली. त्यांचे भागातून कौतुक होत आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)