Pune Palkhi Update: रविवारी पालखी सोहळे पंढरीकडे, पहाटे पासून पुण्यात वाहतुकीत बदल, जाणून घ्या कोणते मार्ग बंद

Pune Palkhi Update: रविवारी पालखी सोहळे पंढरीकडे, पहाटे पासून पुण्यात वाहतुकीत बदल, जाणून घ्या कोणते मार्ग बंद


पुणे सोलापूर आणि पुणे सासवड रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार


माऊलींचा पालखी सोहळा करणार सासवडकडे प्रस्थान


तुकोबारायांचा पालखी सोहळा लोणी काळभोरकडे मार्गस्थ होणार

प्रकाश राजे/ पुणे

Pune Palkhi Update : दोन दिवसाच्या मुक्कामनंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे आषाढी वारीच्या पुढच्या प्रवासासाठी रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान करतील यावेळी सोहळ्याच्या मार्ग सुकर व्हावा याच्या नियोजनासाठी पुण्यातील रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. रविवारी २२ रोजी पहाटेपासून हे बदल पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे, त्यामुळे भाविकांनी या बदलाची नोंद घ्यावी व दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी माहिती वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

माऊलींचा पालखी सासवडकडे, चढणार दिवे घाटाची अवघड वाट

Sant Dyaneshwar Maharaj Palkhi माऊलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात आहे, उद्या पालखी हडपसर मार्गे सासवड कडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे भवानी पेठ ते हडपसर रस्ता Pune-solapur महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. हडपसर नंतर माऊलीचा पालखी सोहळा दिवेघाटाची अवघड वाट चढणार आहे यानंतर पालखी सासवड मुक्कामी विसावेल.

तुकोबारायांचा पालखी सोहळा लोणी काळभोरकडे

Sant Tukaram Maharaj Palkhi संत तुकोबारायांचा पालखी सोहळा नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरातून सोलापूर रस्त्याने मार्गस्थ होईल. दोन्हीही पालखी सोहळे लष्करी भागट येतील तेतुन हडपसर पर्यंत सोलापूर मार्गाने मार्गस्थ होणार आहेत. तिथून पुढे दोन भिन्न मार्गाने मार्गस्थ होतील. त्यामुळे पालखी शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्यानंतर टी पूर्ववत करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

पुण्यातील हे रस्ते असतील वाहतुकीसाठी बंद

Pune Traffic संत कबीर चौक ते रामोशी गेट, संत कबीर चौक ते बेलगाम चौक, गोळीबार मैदान ते ढोले पाटील चौक, ढोले पाटील चौक ते रामोशी गेट चौक, मम्मा देवी चौक ते गोळीबार मैदान, बिशाप स्कुल ते मम्मा देवी चौक, ट्रायलक हॉटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक, भैरोबा नाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, बि. टी. कवडे रस्ता चौक ते कालुबाई मंदिर चौक, रामटेकडी, मगरपट्टा ते हडपसर गांव वेस ( मध्यरात्री दोन ते दुपारी दोन)
सिरम चौक ते सोलापूर रस्ता, १५ नंबर फाटा ते solapur रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड, खडीमशीन चौक ते बोपदेव घाट ( वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारा)

Pune Palkhi Update
पालखी प्रस्थान दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनाना मनाई करण्यात आली असून टप्यात्प्याने वाहतूक प्रूव्हवत कारण्यात येणार आहे, तसेच सासवडकडे जाण्याऱ्या दिंडीतील वाहनानी भैरोबणाला, लुल्ला नगर, कोंढवा, बोपदेव घाटाचा उपयोग करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मदतीसाठी पुणे वाहतूक नियंत्रक कक्ष ०२०- २६६८५०००, २६६८४००० या क्रमांकवर संपर्क करवा असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)