Pune Palkhi
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळे पुण्यात मुक्कामी
Pune Palkhi पुण्यनगरीत विसावला संतांचा मेळा पुण्यनगरी भक्तिरसात चिंब, पादुका दर्शनाला लाखोंची गर्दी
Pune Palkhi : आषाढी वारीनिमित्ताने Ashadhi vari पंढरपूरकडे लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन निघालेले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे पुण्यात दोन दिवसाच्या मुक्कामासाठी विसावले. साधू , संत आणि वारकरी यांचा संतांचा मेळा पुण्यनगरीत विसावला असून संपूर्ण पुणे शहर वैष्णवमे झाले असून भक्तिरसात चिंब झाले आहे. पादुका दर्शनासाठी लाखोंची गर्दी होत असून प्रशासनाने चोख व्यवस्था केलेली आहे.
माऊलींचा मुक्काम पालखी विठोबा मंदिरात
Sant dyaneshwar maharaj Palkhi Pune आळंदीहून १९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भक्तिभावात प्रस्थान झाले आळंदीनंतर पहिलाच मुक्काम हा पुण्यात असतो . दिघी, कळस , विश्रांतवाडी, फुलेनगर असा प्रवास करीत पालखी सोहळ्याने पुण्यात प्रवेश केला .संगमवाडी येथे माऊलींचे आगमन होताच पुण्यनगरीला भक्तीचे उधाण आले . माऊलीच्या जयघोषात पाळीचे अभूतपूर्व स्वागत झाले. यावेळी संत तुकाराम महाराज पालखीची भेट हि पुण्यात झाली. यानंतर यानंतर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामाला विसावली यावेळी भाविकांनी जागोजागी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आनंदांत स्वागत केले.
तुकोबारायांचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात
Sant Tukaram maharaj Palkhi Pune देहू येथून १ ८ जूनला जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, देहू नंतर पिंपरी चिंचवडचा आकुर्डीहून मुक्काम उरकून पालखी सोहळा दोन दिवसासाठी पुण्यनगरीत असतो. दापोडीचा विसावा उरकून संचेती चौकमार्गे पालखी सोहळा Pune City पुण्यनगरीत दाखल झाला चांदीच्या सजवलेल्या रथातील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी एकच गर्दी केली होती, भक्तिभावात पुणेकरांनी तुकोबारायांचे स्वागत केले यावेळी पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तुकोबारायांची पालखी विसावते. नित्य आरती , कीर्तनसेवा यामुळे नानापेठेत हरिनामाचा जागर सुरु आहे. संचेती चौकात पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुषवृष्टी करण्यात आली.
पुण्यनगरीला भक्तीचे उधाण, पादुका दर्शनाला लाखोंची गर्दी
Pune Palkhi संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळे पुणे शहरात दोन दिवसाच्या मुक्कामी असताना भाविकांनी भवानी पेठ व नाना पेठ या दोन्ही ठिकाणी पादुकांच्या दर्शनासाठी अखंड गर्दी केली आहे . दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगा लागल्या असून भाविकांचा उत्साह टिपेला आहे . पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन झाले असून प्रशासनाने सर्व सुविधा देऊ केल्या आहेत. जागोजागी भोजनाची व महाप्रसादाची सेवा सुरु आहे वारकऱ्यांच्या सेवेत कुठलीच कमतरता राहणार नाही याची प्रत्येक पुणेकर काळजी घेत आहे. तर भजन,कीर्तन यामुळे पुणे भक्तिरसात चिंब झाले आहे . उद्या दोन्ही सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतील. Pune Police या साठी वाहतुकीत बदल केला आहे.






