Online Gaming
राज्यात Online Gaming बंद करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Online Gaming ऑनलाइन गेमिंग बंद करण्यासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. ऑनलाइन लॉटरी व गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली आहे, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार कैलास पाटील यांनी Online Gaming ऑनलाईन गेमिंग बाबत प्रश्न विचारत राज्यात अशा Online Gaming वर बंदी घालण्याची मागणी केली त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ऑनलाईन गेममुळे नवीन पिढी, मध्यमवर्गीय लोक आहारी चालले आहेत यातून पैसे हारत आहेत, यातून काही गुन्हेगारीकडे वळत आहेत तर काहीजण आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. हा ऑनलाईन गेमचा रोग अलीकडच्या चार पाच वर्षात वेगाने वाढला आहे.
ऑनलाईन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने राज्यसरकारणे पडताळणी केली मात्र तसा कायदा राज्यसरकार करू शकत नाही तसा कायदा केंद्र सरकार करू शकते त्यासाठी केंद्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंग नियंत्रणासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. तसा कायदा करावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
आमदार अभिजित पाटील यांनी सेलिब्रिटी करीत असलेल्या Online Gaming ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीवर बंदीची मागणी केली यावर ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले व अशी बंदी घालता येईल का याची पडताळणी करण्याचे आदेश दिले. तर सुधीर मुनगंटीवार यांनी चार राज्यात बंदी आहे त्याचा अभ्यास करावा व राज्यात ऑनलाईन गेमिंगला बंदी घालावी अशी मागणी केली.





