Maratha Arkshan
Maratha Arkshan पाच दिवसांच्या आंदोलनंतर सरकारकडून जीआर
Maratha Arkshan मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठे यश
Maratha Arkshan मराठा आक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ तारखेपासून सुरु असलेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला आज मोठे यश मिळाले, मनोज जरांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्याने मराठ्यांनी मुंबईच मैदान जिंकलं असून मुंबईसह राज्यभरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे आणि विजयाचा गुलाल उधळला. मनोज जरांगेनी आंदोलन मागे घेतले असून आज आंदोलनासाठी आलेले मराठा कार्यकर्ते मुंबईतून माघारी फिरतील.
मराठ्यांनी मुंबई रोखली, आंदोलन टिपेला
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदानावर मराठ्यांचे भगवं वादळ धडकलं आणि आरक्षणाचा एल्गार केला आहे. २९ तारखेपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले यावेळी मराठा महामोर्चासाठी आलेल्या मराठ्यांच्या जनसैलाबाने मुंबई जागेवर थबकली. तर आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु करीत आता सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही,आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा पवित्रा घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यानंतर पाच दिवसात त्यांनी त्यांचा निर्धार तसूभरही कमी पडू दिला नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबईत ठिय्या दिला त्यामुळे यातुन मार्ग काढणे सरकारसाठी आव्हान होते.
Maratha Arkshan अखेर मागण्या मान्य, सरकारकडून जीआर
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु करीत आठ मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यापैकी पाच मागण्या सरकारने आज मान्य केल्या व तसा शासन आदेश काढला. त्यानुसार १ ) हैद्राबाद गॅझेटिअर नुसार कुणबी नोंदी करण्यात येईल. २) मराठा आंदोलकांवर झालेले सर्व गुन्हे महिन्याभरात मागे घेण्यात येतील ३)सातारा गॅझेटिअर नुसारही कुणबी नोंदी करण्यात येतील. ४) आरक्षणाच्या आंदोलनात बळी गेलेल्या वारसांना नोकरी देण्यात येईल ५ )कुणबी मराठा एकच असल्याचा जीआर काढण्यात येईल. या मागण्या मान्य करण्यात आल्या.
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले, प्रताप सरनाईक, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, उदय सामंत आदी सरकारच्या मंत्र्यांनी आझाद मैदानावर मराठा नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली व जीआर ची प्रत सुपूर्द केली व उपोषण मागे घेणायची विनंती केली. यावेळी मनोज जरांगे यांनी आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेतले. यावेळी कार्यकर्त्यानी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला तर मनोज जरांगेही भावुक झाल्याचे चित्र दिसले. त्यांनी कार्यकर्त्याना रात्रीत मुंबई खाली करण्याच्या सूचना केल्या. Maratha Arkshan
आंदोलन मागे, मनोज जरांगे भावुक, उपचारासाठी संभाजीनगरला रवाना
मराठा आंदोलनाला यश येताच मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले, यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले ते भावुक झाल्याचे चित्र कार्यकर्त्यांनी पाहिले. पाच दिवसाच्या उपोषणाने तब्येत खालावल्याने उपोषण मागे घेताच रात्री मनोज जरांगे यांना विशेष रुग्णवाहिकेने उपचारासाठी संभाजीनगर नेण्यात आले तर आंदोलनासाठी मुंबईत गेली पाच दिवसापासून तळ ठोकलेल्या लाखो कार्यकर्त्यांनीही मुंबई सोडत आपल्या गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. व मुंबई खाली करण्यास सुरुवात केली. आझाद मैदान यामुळे रिकामे झाले. तसेच पाच दिवसापासून भरलेले मुंबईचे रस्तेही मोकळे झाले.
राज्यात मराठा कार्यकर्त्यांकडून गुलाल आणि फटाक्याची आतिषबाजी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक दशके सुरु असलेल्या लढयाला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आंदोलनात यश आले. टीव्ही व सोशल मीडियावर याची माहिती मिळताच मुंबईसह राज्यभरात प्रत्येक गावात विशेषतः मराठवाड्यात मराठा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तर अनेक ठिकाणी साखर वाटून मनोज जरांगे यांचे अभिनंदन करण्यात आले.






