Mahashivratri: महाशिवरात्रीला सोळशीचा हरेश्वर डोंगर प्रकाशाने उजळला

Mahashivratri: महाशिवरात्रीला सोळशीचा हरेश्वर डोंगर प्रकाशाने उजळला

Mahashivratri -पायथा ते माथा ३७ लाखाचे वीज जोडणीचे काम पूर्ण

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांची शब्दपूर्ती

Mahashivratri : कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर असेलल्या व सोळशी गावचे आराध्या दैवत हरेश्र्वर मंदिर असलेल्या हरेश्वर डोंगर महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रकाशाने उजळला आहे. यामंदिराला पहिल्यांदाच वीज जोडणी मिळाली असून डोंगराचा पायथा ते डोंगरावरील हरेश्वर मंदिरपर्यंत पथदिवे उभे विद्युत जोडणीचे काम ३ ७ लाख रुपये निधी खर्चून पूर्ण झाल्याने इतिहासात पहिल्यांदाच या डोंगरावरील मंदिर महाशिवरात्रीला आकर्षक रोषणाईने सजले असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रकाशाने उजळले आहे .

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वाई आणि खंडाळा या तीन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हरेश्वर डोंगरावर सोळशी गावचे आराध्य हरेश्वरचे शिवमंदिर आहे. हरेश्वर हे सोळशी गावातील सोळा शिवलिंगांमध्ये सर्वात उंच असलेले शिवलिंग आहे. येथे हरेश्वर आणि धारेश्वर असे दोन शिवलिंग स्थित आहेत. या डोंगराच्या शिखरावरून खंडाळा तालुका मागील बाजूस दिसतो, तर पश्चिमेस वाई तालुका दिसतो. खंबाटकी घाटाचे दृश्य अत्यंत सुंदर आहे. नीरा नदी आणि लोणंद परिसरातील उद्योगक्षेत्र देखील या ठिकाणाहून दिसतात. हे मंदिर साधारण हे 1000 मीटरपेक्षा अधिक उंचावर आहे. सर्व बाजूंनी हिरवागार प्रदेश व विहंगम निसर्ग सौंदर्य पहावयास मिळते. उंच डोंगर आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे वर्षभर भाविक या ठिकाणी भेट देतात.

hareshwar temple

या हरेश्वर डोंगरावर वीज नव्हती त्यामुळे भाविकांची गैरसोय व्हायची अखेर या महाशिवरात्रीला वीज जोडणी मिळाली डोंगरातून मंदिराच्या विकासकामाला निधी मिळाला. जिल्हा नियोजन समिती मधून 37 लक्ष रुपये निधी मंजूर होऊन काम गतीने पूर्ण झाल्याने पहिल्यांदाच या डोंगरावर वीज पोहचली. पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि नामदार मकरंद पाटील यांचे माध्यमातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी हा निधी आणण्यासाठी प्रयत्न करून शब्दपूर्ती केली. तसेच वण विभाग सातारा आणि MSEB येथील सर्व अधिकारी वर्ग यांनी हे दुर्गम व अवघड काम पूर्णत्वाला नेले याबद्दल सोळशी गावचे सरपंच आकाश सोळस्कर यांनी ग्रामस्थ व भाविकांच्यावतीने आभार मानले.

Prabhukrupa Automobiles

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)