Locked down the school :लेटलतीप शिक्षकांना शाळेच्या गेटवर रोखले, करंजखोपमध्ये ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक

Locked down the school :लेटलतीप शिक्षकांना शाळेच्या गेटवर रोखले, करंजखोपमध्ये ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक

Locked down the school शिक्षक वारंवार उशिरा, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे

करंजखोप (ता. कोरेगाव) – गावातील शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेत आज सकाळी ग्रामस्थांनी संतापाचा उद्रेक झाला. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक वेळेवर शाळेत येत नसल्याचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शाळेचे गेट बंद करून त्याला टाळे ठोकले Locked down the school व लेटलतीप शिक्षकांना गेटवर रोखले गेल्याने एकच खळबळ उडाली. उशिरा आलेल्या शिक्षकांना ग्रामस्थ व पालकांनी चांगलेच सुनावले व शाळा व्यवस्थापनांने यात सुधारणा न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला.

कोरेगाव तालुक्यातील करंजखोप गावातील शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शिक्षक अनेकदा उशिरा शाळेत पोहोचतात, काही वेळा अनुपस्थित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि त्यांचे शिक्षण मागे पडत आहे. या सर्व प्रकाराबाबत अनेकदा तक्रारी करूनही शिक्षण प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. आजही नेहमीप्रमाणे मुले शाळेत लवकर पोहचली मात्र शिक्षक वेळेत आले नाहीत त्यामुळे विद्यार्थाना ताटकळत बसावे लागले हि दक्ष पालकांच्या लक्षात आली यानंतर काही वेळातच शाळेसमोर विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी शिक्षण व्यवस्थापन व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. गावातील वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले होते.

ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर शिक्षकांचा कारभार सुधारला नाही आणि जबाबदारी निश्चित झाली नाही, तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.

दुसरीकडे, या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत शिक्षण संस्थेच्या प्रशासनानेही याची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष येऊन शाळेची पाहणी करावी आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी राजेंद्र धुमाळ सतीश धुमाळ रमेशा जाधव पिलाजी धुमाळ धनंजय धुमाळ नितिन धुमाळ अमोल धुमाळ विलास जगताप पोलीस पाटील विनोद वर्पे ग्रामसेवक सागर पानसरे सिराज शेख इ उपस्थित होते. सहाय्यक विभागीय अधिकारी विनोद दाभाडे यांनी शाळेला भेट देत माहिती घेतली.

WhatsApp Image 2025 10 08 at 9.20.23 AM

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)