Leopard Attack दोन बिबट्यांनी पतीला घेरले, पण पत्नी धावली ‘वाघीण’ बनून; हातात दांडकं घेत पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले!

Leopard Attack दोन बिबट्यांनी पतीला घेरले, पण पत्नी धावली ‘वाघीण’ बनून; हातात दांडकं घेत पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले!

Leopard Attack नाशिकच्या पिंपळगाव बसवंत जवळील उंबरखेड शिवारातील थरारक घटना

नाशिक: ‘पती परमेश्वर’ हे आपण अनेकदा ऐकतो, पण नाशिकमध्ये एका पत्नीने आपल्या पतीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे शब्द खरे करून दाखवले आहेत. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत जवळील उंबरखेड शिवारात ही थरारक घटना घडली, जिथे दोन बिबट्यांनी एकाच वेळी पतीवर Leopard Attack हल्ला चढवला. मात्र, पत्नीने जराही न डगमगता हातात उसाचे दांडकं घेऊन बिबट्यांचा प्रतिकार केला आणि पतीचा जीव वाचवला.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण (वय ३८) आणि त्यांची पत्नी आवताबाई (वय ३२) हे ऊसतोड कामगार असून ते सध्या उंबरखेड शिवारात कामासाठी वास्तव्यास आहेत. घटनेच्या वेळी संतोष हे उसाच्या शेतात काम करत होते. अचानक दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांनी त्यांच्यावर झडप घातली. एकाच वेळी दोन हिंस्त्र श्वापदांनी हल्ला केल्याने संतोष खाली कोसळले आणि बिबट्यांनी त्यांचे लचके तोडण्यास सुरुवात केली.

पत्नीने दाखवले ‘रणरागिणी’चे रूप पतीचा आरडाओरडा ऐकून आवताबाईंचे लक्ष तिकडे गेले. समोर साक्षात मृत्यू उभा असल्याचे पाहूनही त्या घाबरल्या नाहीत. उलट, पतीला वाचवण्यासाठी त्यांच्यात एक वेगळीच शक्ती संचारली. आवताबाईंनी क्षणाचाही विचार न करता हातात उसाचे जाड दांडकं घेतले आणि त्या बिबट्यांच्या दिशेने धावत सुटल्या.

त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करत Leopard Attack बिबट्यांवर प्रतिहल्ला चढवला. एका महिलेचा हा अवतार आणि आक्रमक पवित्र पाहून बिबट्यांनीही धूम ठोकली. आवताबाईंच्या या धाडसामुळे संतोष चव्हाण यांचा जीव थोडक्यात वाचला.

परिसरात कौतुक आणि भीती या हल्ल्यात संतोष चव्हाण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आवताबाई यांनी ज्या धैर्याने दोन-दोन बिबट्यांशी लढा दिला, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण परत आणल्याची कथा आपण ऐकली आहे, पण आवताबाईंनी आधुनिक काळात आपल्या धाडसाने त्याची प्रचिती दिली आहे.

#Nashik Leopard Attack, #नाशिक बिबट्या हल्ला, #Nashik leopard attack news,

हे पण वाचा Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय हालचाल; महापालिका निवडणुकीसाठी पवार काका-पुतण्या एकत्र येण्याचे संकेत

हे पण वाचा Shalinitai Patil राजकारणातील लढवय्यी वाघीण काळाच्या पडद्याआड: मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

हे पण वाचा Pune Leopard Attack: अंधारात बोलायला गेला अन बिबट्याने हल्ला केला

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)