Internship साठी सुवर्णसंधी, थेट पाटबंधारे प्रकल्प मंडळात

Internship साठी सुवर्णसंधी, थेट पाटबंधारे प्रकल्प मंडळात

Internship साठी काय आहे पात्रता? जाणून घ्या सविस्तर

सातारा/प्रतिनिधी: Job Placement सातारा येथील पाटबंधारे प्रकल्प मंडळामार्फत Internship Program ची घोषणा करण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळाली आहे, विद्यार्थ्यांनी या Internship चा लाभ अवश्य घ्यावा.

काय काय Internship साठी पात्रता पहा

सध्या इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या टी.ई., बी.ई. आणि एम.ई. (Appearing) वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या वरील इंटर्नशिपसाठी AICTE Internship Portal वरुन स्वतः विद्यार्थी (Student Login) लॉगिनचा वापर करुन ऑनलाईन 27 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिहे कठापूर उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अ.पं. निकम यांनी केले आहे.

कालावधी आणि निवड प्रक्रिया

इंटर्नशिप कालावधी ६ आठवडे असणार आहे. ही इंटर्नशिप मानधनाशिवाय असणार असून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड प्रकिया मुलाखतीनंतर निवड केली जाईल आहे.


सातारा जिल्हा व इतर जिल्हयांमधील सातारा लगतच्या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच सध्या T. E.टी.ई., बी.ई.B. E. आणि एम.ई. M.E. मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. इंजिनिअरींग Engineering पासआऊट विद्यार्थ्यांना हि योजना लागू नाही. इंटर्नशिपव्दारे सातार पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा व सातारा सिंचन मंडळ, सातारा यांच्या अंतर्गत चालणा-या विविध प्रकल्पांचे प्रत्यक्ष आणि क्षेत्रिय अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)