Yatra 2026:कोरेगाव तालुक्यात यात्रेचा हंगामाला सुरुवात, ढोल-लेझीमचा गजर आणि चुलीवरच्या मटण-भाकरीची लज्जत!

Yatra 2026:कोरेगाव तालुक्यात यात्रेचा हंगामाला सुरुवात, ढोल-लेझीमचा गजर आणि चुलीवरच्या मटण-भाकरीची लज्जत!

Yatra 2026 जाणून घ्या तुमच्या गावची यात्रा कधी ?

प्रकाश राजे कोरेगाव | ३१ मार्च २०२६

Yatra 2026 उन्हाची चाहूल लागताच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आता ग्रामदैवतांच्या यात्रांचा उत्साह दुणावणार आहे १ एप्रिलपासून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात यात्रेचा हंगाम सुरु होत असून यानिमित्ताने गावांची इकोसिस्टिमला गती येते. शेतीची कामे आटोपून बळीराजा आता यात्रोत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघतो, यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या चैतन्याचे वातावरण आहे. भक्ती, लोककला आणि मनोरंजनाचा हा त्रिवेणी संगम गावागावांत पाहायला मिळत आहे. यात्रा हा इव्हेंट नसून तो गावाकडच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे.

शेती आणि यात्रेचे अतूट नाते

Yatra Special भारतीय ग्रामीण जीवनात शेती आणि यात्रा यांचे नाते अतूट आहे. निसर्गाच्या लहरींवर अवलंबून असणारा शेतकरी वर्ग, पीक हाती आल्यानंतर देवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यात्रा भरवतो. कष्टाच्या कामातून थोडा निवांत वेळ काढून, संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येते. आजच्या आधुनिक काळातही या यात्रांनी आपली मूळ ओळख जपली असून, त्या संस्कृती संवर्धनाचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहेत.

देवांचा छबिना आणि ढोल-लेझीमचा थरार

यात्रेचा सर्वात नयनरम्य क्षण म्हणजे प्रत्येक गावी रात्री निघणारा देवांचा ‘छबिना’. चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या देवाची मूर्ती जेव्हा बाहेर पडते, तेव्हा अवघे गाव भक्तीच्या लाटेत न्हाऊन निघते. या छबिन्यासोबत ढोल आणि लेझीम पथकांचा मोठा ताफा असतो. ढोलाच्या ठोक्यावर लेझीमचे विविध ‘डाव’ खेळताना तरुणांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हा सोहळा स्मरणीय ठरतो. या छबिन्यात ढोल लेझीमच्या तालावर अबालवृद्धांची पावले आपोआप ठेका धरतात तेव्हा लेझीमचे धडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या यात्रेच्या छबिन्यातून शिकवले जातात.

लोकनाट्य तमाशा आणि कुस्तीचा थरार

गुढीपाडव्यानंतर गावोगावच्या यात्रेचा मुख्य आकर्षण या लोकनाट्य तमाशा हि असतात यात्रेची रात्र खऱ्या अर्थाने रंगते ती ‘लोकनाट्य तमाशा’ मुळे. महाराष्ट्रातील नामंकित तमाशाचे फड यानिमित्ताने यात्रेतून आपली लोककला सादर करतात. गण-गवळण, लावणी आणि बतावणीतून ग्रामीण समाजमनाचे दर्शन घडते. तर दुसरीकडे, यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक ‘कुस्तीचा आखाडा’. लाल मातीत घाम गाळणाऱ्या पैलवानांच्या कुस्त्या पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक गर्दी करतात. या आखाड्यांमुळेच ग्रामीण भागातील कुस्तीची गौरवशाली परंपरा आजही टिकून आहे.

चुलीवरच्या जेवणाची लज्जत आणि पाहुणचार

यात्रेचा आनंद तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा चुलीवरच्या मटण-भाकरीची मेजवानी मिळते. नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने एकत्र आल्यावर चुलीवर शिजवलेल्या तिखट-झणझणीत जेवणाचा आस्वाद घेतला जातो. हा पाहुणचार ग्रामीण जीवनातील आपुलकीचे दर्शन घडवतो. यानिमित्ताने वर्षभरातून पाहुणे मंडळी, मित्र मंडळी यांच्या भेटीगाठी होत असतात.

जाणून घ्या: कोरेगाव तालुक्यातील यात्रांचे सविस्तर वेळापत्रक

तालुक्यातील विविध गावांमधील यात्रांचे तारखेनुसार नियोजन खालीलप्रमाणे आहे:

  • २ व ३ एप्रिल: शहापूर (श्री वाघजाई देवी), बिचुकले (श्री जानाई देवी) आणि जाधववाडी (श्री हनुमान).
  • २ ते ४ एप्रिल: आसनगाव (श्री सालपाई देवी).
  • ६ व ७ एप्रिल: चौधरवाडी (श्री कमलामाता).
  • ८ व ९ एप्रिल: विखळे (श्री भैरवनाथ).
  • ९ व १० एप्रिल: घिगेवाडी (श्री कालिका देवी).
  • १० व ११ एप्रिल: पिंपोडे बुद्रुक (श्री भैरवनाथ).
  • १० ते १२ एप्रिल: वाघोली (श्री म्हातोबा).
  • ११ व १२ एप्रिल: बनवडी.
  • १२ व १३ एप्रिल: नांदवळ (श्री म्हातोबा-जोगुबाई).
  • १३ व १४ एप्रिल: सोळशी (श्री भैरवनाथ) व सर्कलवाडी (श्री जानुबाई देवी).
  • १४ व १५ एप्रिल: देऊर (श्री भैरवनाथ).
  • १६ व १७ एप्रिल: दहिगाव (श्री भैरवनाथ) व नायगाव (श्री नागेश्वर-जोगुबाई).
  • १९ व २० एप्रिल: तडवळे सं. वाघोली व तळीये (श्री भैरवनाथ).
  • २८ व २९ एप्रिल: करंजखोप (श्री जानुबाई देवी).
  • ३० एप्रिल व १ मे: वाठार स्टेशन (श्री निष्णाई देवी) – यात्रेचा समारोप.

अशा प्रकारे कोरेगाव तालुक्यात भक्ती, शक्ती आणि युक्तीचा संगम असणारा हा यात्रोत्सव महिनाभर मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)