Ganesh Utsav
Ganesh Utsav वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३९ गणपती मंडळे,
२३ गावात एक गाव एक गणपती उपक्रम
Ganesh Utsav वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, देऊर, अंबवडे या मोठ्या गावात आवाज फक्त ढोल ताशाचाच
घरगुती गणपती बाप्पाचेही जल्लोषात आगमन
Ganesh Utsav लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात भक्तिभावात झाले. घरगुती आणि सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन झाले विशेष म्हणजे यंदा राजधानी सातारला सुरु असलेल्या डॉल्बी नको या मोहिमेला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे अशावेळी उत्तर कोरेगावात सर्वच गावात डॉल्बी आऊट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. डॉल्बी ऐवजी ढोल,ताशा, लेझीम अशा पारंपरिक वाद्याचा तालावर बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व सामान्य माणसानेही बाप्पाच्या आगमनाचा आनंद लुटला.
पळशी पासून सोळशी पर्यंतच्या कोरेगावच्या उत्तर भागात यावर्षी Ganesh Utsav बापाच्या आगमनाचा उत्साह आणि आनंद दुणावला आहे. भागात असलेल्या वाठार पोलीस ठाण्याच्या परिसरातील ४६ गावात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना भक्तिभावात झाली. कुंभारवाड्यातून लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी सर्वांचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला होता. तर दिवसभर कुंभारवाड्यातील गणपती कारखान्यावर भाविकांची गर्दी झाली होती.
तसेच ४६ गावातील २३ गावांनी एक गाव एक गणपती या उपक्रमात सहभाग घेतला असून या गावांत प्रत्येकी एकच सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली आहे तर इतर गावात ११६ सार्वजनिक गणपती मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. अशा एकूण १३९ मंडळांनी यंदा गणपती उत्सवात सहभाग घेतला आहे.
“गणेशोत्सव हा पारंपरिक साजरा होणारा सार्वजनिक सण असून त्यामध्ये डॉल्बी व डीजेचा वापर करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा उपयोग करावा.” यावेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोणतेही मंडळ जर डॉल्बी किंवा डीजेचा वापर करताना आढळले, तर त्या मंडळावर तसेच संबंधित डॉल्बी मालकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६(ई) आणि ३३(न) अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गणपती आगमन, पूजन व मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नागरिकांनी व गणेश मंडळांनी सहकार्य करून उत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते
यासर्व मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी यंदा डॉल्बीला फाटा देत साधेपणाने मिरवणूका काढल्या तर अनेक मंडळांनी पारंपरिक ढोल, ताशा, लेझीम तर काही मंडळांनी टाळ-मृदूंगाच्या तालावर मिरवणुका काढून आनंद साजरा केला. यामुळे यंदा बापाच्या आगमन पूर्णपणे डॉल्बीमुक्त झाले त्यामुळे कर्णकर्कश आवाजापासून जेष्ठ व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याने त्यांची पोलीस प्रशासन व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले तर डॉल्बी नसल्यामुळे अनेकांनी पहिल्यांदाच मिरणूकात जवळून पहिल्या अशीच सांस्कृतिक विचार मंडळांनी पुढे नेट विसर्जन मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने काढाव्यात अशी मागणी होत आहे.
——————————————————————————————————–

वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १३९ गणपती मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे, यंदा २३ गावात एक गाव एक गणपती आहे यासह भागातील सर्व मंडळांना डॉल्बीबाबत कडक सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या होत्या व डॉल्बीविरहित उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला मंडळांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला याचा आनंद आहे त्यामुळे प्रथमच सर्वच भागात पारंपरिक ढोल ताश्याच्या गजरात आगमन मिरवणूक काढण्यात आल्या याचा आनंद आहे, तरीही येत्या दहा दिवसात व विसर्जनासाठी डॉल्बीची आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास अशा मंडळावर पोलिसांची करडी नजर राहणार असून कोणाचीही गय न करता कायदेशीर कारवाई करणार आहे
सपोनि अविनाश माने, वाठार पोलीस स्टेशन
——————————————————————————————————————-

गणेशोत्सव म्हटलं कि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते, हा उत्सव लोकांना एकत्र बांधून ठेवतो अशावेळी गणपती मिरवणुकांमध्ये डॉल्बीची जी प्रथा सुरु झाली त्याच्यामुळे लोक मिरवणूकातून कर्णकर्कश आवाजामुळे सहभागी होण्याऐवजी लांब होऊ लागली. डॉल्बीच्या बाबत दैनिक तरुण भारताने जी सडेतोड भूमिका घेतली त्याबाबत त्यांचे अभिनंदन, तरुण युवकांची भूमिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेली साथ यामुळे भागात पहिल्यादा डॉल्बीमुक्त बाप्पाचे आगमन झाले. आमच्या घिगेवाडी गावात तर अनेक वर्षांपासून एक गाव एक गणपती तर असतोच शिवाय घरगुती गणपतीही एकाच वेळी एकच मिरवणुकीने पारंपरिक पद्धतीने निघतात.
नारायण सावंत, लोकनियुक्त सरपंच, घिगेवाडी







