GANESH FESTIVAL :गणपती आरतीला पोलिसांना बोलवताय मग अगोदर CCTV CAMERA बसवा..

GANESH FESTIVAL :गणपती आरतीला पोलिसांना बोलवताय मग अगोदर CCTV CAMERA बसवा..

GANESH FESTIVAL वाठार पोलिस स्टेशनचे अधिकारी अविनाश माने यांचे गणेश मंडळांना आवाहन

GANESH FESTIVAL : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असेलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन राहिला आहे अशावेळी सगळीकडे गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आहे. पोलिसांनी गणेश मंडळाच्या बैठका घेत योग्य त्या सूचना दिल्या आहेत एक गाव एक गणपती या उपक्रमातून पोलीस व गणेश मंडळे एकत्रितपणे बाप्पाचा उत्सव साजरा करतात अशावेळी पोलीस अधिकारी यांनी गणेश मंडळाच्या आरतीला उपस्थित राहावे अशी मंडळांची अपेक्षा त्यामुळे असते गणपती आरतीला पोलिसांना बोलवताय मग अगोदर CCTV बसवा असे आवाहन वाठार पोलिस स्टेशनचे अधिकारी अविनाश माने यांचे गणेश मंडळांना आवाहन केले आहे त्यांच्या या आवाहनाला उत्तर कोरेगावातील अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

प्रतिवर्षी युवकांना आकर्षित करणारा गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे अनेक गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या तयारीत मग्न आहेत धर्मादाय पोलिस स्टेशन यांचे परवाने काढायचे, अकरा दिवसात काय कार्यक्रम ठेवायचे आरतिला कुणाला बोलवायचे गणपती मिरवणूक कशी काढायची याचे सध्या सगळ्याच सार्वजनिक मंडळाचे नियोजन सुरू आहे अशावेळी पोलीस दलही गणेश मंडळांसोबत विविध उपक्रम राबवित असते . यात एक गाव एक गणपती, डॉल्बीमुक्त उत्सव, गुलाल विरहित मिरवणूक, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या देखाव्यांना प्रोत्साहन असे उपक्रम गणेश मंडळे व पोलीस एकत्रितपणे राबवित असतात. त्यातच यंदा पोलिसांनी गणेश मंडळाला त्यांच्या भागाच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV CAMERA बसवण्याचे आवाहन केले आहे.

कोरेगाव तालुक्यातील 47 गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या वाठार पोलिसांनीही या उत्ववाबाबत योग्य नियोजन केलं आहे लवकरच गणेश मंडळांना बोलावून योग्य त्या सूचना पोलिस देतील पण वाढत्या चोऱ्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी CCTV CAMERA गावोगावी बसवणं काळाची गरज बनली आहे त्यानुसार आता गावातील चौकात आपल्या मंडळासमोर तरी एक CCTV CAMERA बसवा अस आवाहन वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे

गणेश मंडळाची आरती माझ्या हाते करायची असेल तर तुम्हाला CCTV CAMERA बसवावा लागेल असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आता ज्या गणेश मंडळांना त्यांच्या गणपतीची आरती पोलिस अधिकाऱ्याकडून करायची आहे त्यांना आपल्या गावातील किमान एका चौकात CCTV CAMERA बसवावा लागेल. Maharashtra Police

#Ganesh Chaturthi #GaneshMandal #Ganeshotsav #MaharashtraPolice #police #Ganpatiutsav

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)