Econoic News प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे सुयेकचे ३६ वे अधिवेशन संपन्न
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे सुयेकचे ३६ वे अधिवेशन संपन्न
आर्थिक वृत्तप्रतिनिधी Economics News
Economics News रतन टाटा किंवा टाटा ग्रुप हा जगातील एकमेव उद्योग समूह आहे जो आपल्या एकूण उत्पन्नातील ६०% वाटा हा सामाजिक कल्याणासाठी वापरतो अशा स्वरूपाचे धोरण जर सर्वच उद्योजक, व्यावसायिक यांनी वापरली तरच हा देश शाश्वत विकास घडवू शकेल आणि कल्याणकारी अर्थशास्त्राला अर्थ प्राप्त होईल. असे प्रतिपादन विजयकुमार चोले यांनी केले.
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूरचे (सुयेकचे) ३६ वे वार्षिक अधिवेशन प्रा. जालिंदर यादव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात संपन्न झाले. हे अधिवेशन होत असताना सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे मुंबई अशा विविध जिल्ह्यांमधून अर्थशास्त्राचे प्राध्यापक सहभागी झाले होते. हे अधिवेशन ‘डॉ. मनमोहन सिंग आणि उद्योग रत्न रतनजी टाटा यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान’ आणि ‘फळे व भाजीपाल्याचे अर्थशास्त्र’ या दोन विषयांवर संशोधनात्मक चर्चा होण्याकरता भरविण्यात आले होते.
या अधिवेशनाचे बीजभाषक प्रमुख पाहुणे प्रो. विजयकुमार चोले यांनी अधिवेशनाला संबोधित करताना हे स्पष्ट केले की, भारतीय अर्थव्यवस्था जरी वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असली तरीही भारतातल्या गरिबीचा आणि दारिद्र्याचा विचार करता श्रीमंत आणि गरीब यामध्ये वाढत जाणारी दरी ही भविष्यातील सर्वात मोठी चिंता असणार आहे, असे स्पष्ट केले. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी आता निती अर्थशास्त्राच्या अंगाने विचार करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याशिवाय डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत दिलेले योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण देशाच्या आर्थिक अडचणीच्या काळात जेंव्हा देशाला सोने गहाण ठेवावे लागले अशा स्थितीत देशाचे अर्थमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून देशाला आर्थिक दृष्ट्या समर्थ बनवण्याचं महान कार्य जागतिक कीर्तीच्या डॉ. मनमोहन सिंग यांनी केले हे आपणाला विसरून चालणार नाही. फळे व भाजीपाल्याच्या अर्थशास्त्रावरती बोलत असताना त्यांनी पुढे असे म्हटले की शेतकरी हा फक्त देशाचा नाही तर जगाचा पोशिंदा आहे परंतु आज शेतकऱ्याची आर्थिक स्थिती देशातील बिकट असल्याचे अनेक अहवाल हे सरकार दरबारी आहेत अहवालांपेक्षा वस्तुस्थिती फारच भिकट असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे फळे व भाजीपाल्याच्या अर्थशास्त्रज्ञांनी या बाबतीमध्ये विशेष प्रकल्प हाती घेऊन देशाच्या प्राथमिक क्षेत्राला बळकटी देण्याचे कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. जालिंदर यादव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आज जगामध्ये प्रचंड प्रमाणात अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्व क्षेत्रांना व्यापून पुढे जाते आहे. याचे निश्चितच काही चांगले परिणाम आहेत परंतु भविष्याचा विचार करता त्याचे काही दुष्परिणामही भारतासारख्या अर्थव्यवस्थांना भोगावे लागतील. त्यामध्ये भारतासारख्या देशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना प्रत्येक देशाने शाश्वत अर्थव्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एका क्षेत्राच्या विकासामुळे दुसऱ्या क्षेत्रावरती जर त्याचे दुष्परिणाम होत असतील तर त्याचा विचार करून उपाययोजना पहिल्यांदा संशोधकांनी अभ्यासकांनी विचारात घेणे अपेक्षित आहे. आणि अशा सुचवलेल्या उपायांचा धोरणकर्त्यांनी गांभीर्याने विचार करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन केले.
या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख निमंत्रित म्हणून छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थाचे संस्थापक श्री रामभाऊ लेंबे त्याचबरोबर, स्वागताध्यक्ष म्हणून श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था देऊरचे चेअरमन श्री राजेंद्र कदम, सचिव श्री देवेंद्र कदम, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मेजर प्रवीण चव्हाण तसेच असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले, कार्यवाह डॉ. संजय धोंडे, ‘शिवार्थ’ या संशोधन पत्रिकेचे संपादक डॉ. काशिनाथ तनंगे आणि या अगोदरचे असोसिएशनचे माजी अध्यक्ष, बहुसंख्य संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिवेशनाच्या समारोप समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. एस. देशमुख सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी समारोप प्रसंगी संभोदीत करताना देशाच्या आर्थिक विकासाचे २०४७ पर्यंत महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशातील तरुणांना कौशल्य आधारित शिक्षणाचे आणि प्रशिक्षणाची गरज बोलून दाखवली. याशिवाय भारता मधल्या सर्व अभ्यासकांनी आणि संशोधकांनी जपान, चीन, अमेरिका, जर्मनी या देशांनी विकासाचा वेग आणि त्यामधील सातत्य कसे टिकून ठेवलेले आहे याच्या मागील कारणांच्या अभ्यासण्याची गरज आहे असे स्पष्ट केले.
या अधिवेशनामध्ये जवळपास ३०० अर्थशास्त्राचे अभ्यासक सहभागी झाले होते. या समारंभामध्ये असोसिएशनचे दरवर्षी प्रकाशित होणारे ‘शिवार्थ’ या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन उद्घाटन समारंभात सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या अधिवेशनामुळे अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आणि विद्यार्थी तसेच अभ्यासकांना येणाऱ्या संधी आणि आव्हाने यावरती विचार करण्याच्या दिशादर्शक अशा व्याख्यानांचा लाभ झाला. हे अधिवेशन समाजाकरिता अत्यंत फलदायी ठरेल असा विश्वास अधिवेशनातील सर्व सहभागी सदस्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे, स्थानिक कार्यवाह डॉ. दत्तात्रय शेडगे आणि शिवार्थ या संशोधन पत्रिकेचे स्थानिक सहसंपादक डॉ. सुंदर पोटभरे आणि मनीषा पवार यानी अर्थशास्त्राच्या विभागाच्या वतीने या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी कार्य केले.
हे पण वाचा gold vs silver investment सध्याच्या दरांनुसार गुंतवणूक: सोने घ्यावे की चांदी? तज्ज्ञ काय सांगतात
हे पण वाचा Post Office PPF Account: गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर योजना







