Digital School :घिगेवाडी जिल्हा परिषद शाळेची स्मार्ट वाटचाल

Digital School :घिगेवाडी जिल्हा परिषद शाळेची स्मार्ट वाटचाल

CCTV in Digital school :शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित, गावकऱ्यांचा पुढाकार

Zp Digital School :मुलांच्या सुरक्षेसाठी घिगेवाडीकरांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य: सपोनि अविनाश माने

गावाची जिल्हा परिषद शाळा डिजिटल शाळा बनवण्यासाठी घिगेवाडी गावाने सुरु केलेली मोहीम हि शैक्षणिक विकासाची क्रांती करणारी असून मुलांच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेली सीसीटीव्ही यंत्रणा हा स्त्युत्य निर्णय असून इतर गावांनी त्याचा आदर्श घेऊन गावाची शाळा सुरक्षित करावी असे आवाहन वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील घिगेवाडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या उदघाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच रायण काशिनाथ सावंत, मुख्याध्यापक संजय काळे, माजी उपसरपंच आदिनाथ सावंत व सदस्य-संचालक, रघुनाथ सावंत (काका),पोलीस पाटील महेंद्र घिगे, संचालक व माजी पोलीस पाटील शामराव साळुंखे-,कल्पतरू गॅस सर्व्हिसेस रविंद्र सावंत, सदस्य,दत्तात्रय साळुंखे, निलेश सावंत, प्रतिक सावंत, दत्त नवनाथ अर्थमूव्हर्स, शिक्षिका सारिका ननावरे, सुनिता घिगे, कल्पना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सरपंच नारायण सावंत म्हणाले, घिगेवाडी जिल्हा परिषद शाळा डिजिटल व स्मार्ट करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून भागातील सर्वोत्तम मराठी शाळा बनवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेऊ, या शाळेने गुणवत्तेची परंपरा नेहमीच कायम राखली असून शाळेला सर्वोतपरी सुविधा पुरवून भावी पिढीच्या विकासासाठी घिगेवाडी नेहमीच आघाडीवर राहील.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक,आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, मदतनीस,आजी-माजी चेअरमन-व्हा,चेअरमन, संचालक,आजी-माजी सैनिक संघटना,अध्यक्ष-उपाध्यक्ष-सदस्य स्कूल व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक,शिक्षिका-पालक-विद्यार्थी,राजमाता जिजाऊ महिला ग्राम बचत गट,कर्मवीर ग्रुप, अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन, जाणता राजा ग्रुप, गणेशोत्सव, दुर्गा माता तरुण मंडळ,आशा सेविका, सर्व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)