Big News :सातारा जिल्ह्यातील नायगावच्या ग्रामसभेत फ्रीस्टाईल हाणामारी 

Big News :सातारा जिल्ह्यातील नायगावच्या ग्रामसभेत फ्रीस्टाईल हाणामारी 

Big News :रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांवरून वादंग, ग्रामस्थ भिडले

Big News :सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नायगाव ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावे व मजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला. चर्चेच्या दरम्यान अचानक वादंग वाढला आणि ग्रांमस्थ भिडले. अगदी फ्री स्टाईल हाणामारी झाली यात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली असून या मारहाणीचा व गदारोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. 

Big News नायगाव (ता. कोरेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसभा शुक्रवारी आयोजित केली होती.  ग्रामसभेमध्ये विविध विषयावर सभा सुरु असताना ग्रामसभेत काही लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेत अन्याय झाल्याची तक्रार मांडली. या मुद्द्यावरून बोलाचाली वाढली. त्यामुळे काही काळ ग्रामसभेचे वातावरण तणावपूर्ण झाले. रोजगार हमीच्या कामाविषयी वादंग निर्माण झाले. शेवटी ग्रामस्थांच्यात वाद विकोपाला जाऊन अक्षरश फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामुळे या ग्रामसभेला गालबोट लागले.

यावरून ग्रामसभेचे वातावरण ग्रामपंचायत सभागृहात सुरू असलेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, रोजगार हमी योजनेत पारदर्शकता राखावी व सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी ग्रामस्थांची मागणी पुढे आली आहे.मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकशाहीच्या पवित्र मंदिरातील या हाणामारीच्या घटनेची चांगलीच चर्चा झाली

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)