Big News ओव्हरलोड वाहतूक कराल तर कारवाई होणार

Big News ओव्हरलोड वाहतूक कराल तर कारवाई होणार

बारामतीत पोलिसांचा ऍक्शन प्लॅन, १४ वाहने केली जप्त

Big News ओव्हरलोड वाहनांवर बारामती पोलिसांची मोठी कारवाई

Big News बारामती शहर व परिसरात ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि हायवा वाहनांवर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना सोबत घेऊन मोठी कारवाई करत एकूण १४ वाहने जप्त केली आहेत. या सर्व वाहनांवर खटले तयार करून ते प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती चंद्रशेखर यादव यांनी दिली.
बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरूम व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच अपघात ही होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे. जप्त केलेली वाहने २ ते १० टनांपर्यंत ओव्हरलोड आढळून आली आहेत. यामध्ये प्रत्येक वाहनावर मोठा दंड होण्याची शक्यता आहे. सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. पोलीस प्रशासनाने सर्व वाहनचालकांना याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सातत्याने राबवली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, विलास नाळे तसेच बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे, प्रदीप काळे, माया निगडे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, बारामती पोलिस स्टेशन चे ओंकार सीताप, स्वाती काजळे, अजिंक्य कदम यांनी केली आहे.

‘गेली अनेक महिन्यापासून बारामती वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम रुजवण्यासाठी कारवाया करत आहे.
तरीही अपघातात मृत्युमुखी पडणेचे प्रमाण चिंताजनक आहे.
नागरिकांनी , वाहनचालकांनी सजग राहून वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे.
~गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक


काही चालक नियम मोडून नियम ओव्हरलोड वाहने चालवतात. यामुळे शाळेतील विद्यार्थी, वृद्ध, ग्रामस्थांना धोका निर्माण होतो.वाहतुकीत शिस्त आणि सुरक्षितता यासाठीच मोहीम राबवली जात आहे.’
सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी

‘ओव्हरलोड वाहने चालवणे म्हणजे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर इतरांच्या जिवाशी खेळ आहे. सर्व वाहनचालक, वाहनमालक व ठेकेदारांनी जबाबदारीने वागावे. आम्ही कारवाई करत आहोत ती फक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्हे, तर जनतेच्या सुरक्षेसाठीही आहे.यापुढे अशीच मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाईल.’
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)