Bhavani Temple
Bhavani Temple पायाभरणी व भूमिपूजनाचा शुभारंभ भक्तिभावात
प्रतिनिधी – आदिनाथ धुमाळ
सोनके (ता. कोरेगाव) येथे साकारणार भवानी मातेचे भव्य मंदिर साकारणार असून भवानी मातेच्या Bhavani Temple भव्य मंदिर उभारणीसाठी पायाभरणी व भूमिपूजनाचा शुभारंभ भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. यामुळे कोरेगाव तालुक्याच्या वैभवात भरपडणार आहे.
आध्यात्मिक कार्यासाठी ओळख असलेल्या सोनके गावात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आदिमाया शक्ती भवानी मातेचे मंदिर उभारण्याचे कार्य सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या शुभप्रसंगी हरिद्वार व ऋषिकेश येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने तसेच महाबळेश्वर येथून आणलेल्या पंचगंगेच्या अमृतधारेने भवानी मातेचा विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर यज्ञ, होम-हवनाचे आयोजन करण्यात आले. पुढे विजयराव धुमाळ (बापू) व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी संपन्न झाला.
Bhavani Temple मंदिर उभारणीसाठी गावातील ग्रामस्थ, यात्रा कमिटी व महिला वर्ग एकत्र येत लोकवर्गणीतून सहकार्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंदिरासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देत मूळ जमीन मालक विजयराव धुमाळ (बापू) यांनी विशेष सहकार्य केले आहे. तसेच गावातील महिलांनी लोकवर्गणीतून देवीसाठी पैंजण व मूर्तीसाठी मदत करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
भवानी मातेचे मंदिर एकूण ६४० चौरस फूट क्षेत्रफळाचे असणार असून, सभामंडप व मंदिराचे माप २२×३० चौरस फूट असेल. मंदिराच्या शिखराची उंची सुमारे २१ फूट असणार असल्याची माहिती वैभव धुमाळ यांनी दिली. या पवित्र कार्यामुळे सोनके गावातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हे पण वाचा समर्थ नगरी वाठार स्टेशनला आजपासून हरिनामाचा जागर samarth Wagdev maharaj
