Bhakti Dham जगदगुरू रामानंदचार्य नरेंद्र महाराज यांच्या दिंडीचे वाठार मध्ये भव्य स्वागत.

Bhakti Dham जगदगुरू रामानंदचार्य नरेंद्र महाराज यांच्या दिंडीचे वाठार मध्ये भव्य स्वागत.

आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण.

विजयकुमार दोरक (प्रतिनिधी)

Bhakti Dham श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथून निघालेली “वसुंधरा पायी दिंडी”वाठार स्टेशन येथील श्रीराम पॅलेस या ठिकाणी विसाव्यासाठी आली होती. दिंडीचे स्वागत फलटण -कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश फडतरे, विलास धर्माधिकारी, शिवसेना तालुका संघटक रणजीत सरकाळे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण शितोळे तसेच वाठार स्टेशन भागातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

नरेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली “वसुंधरा पायी दिंडीचे”आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, तेलंगणा, मुंबई, पुणे, गोवा, नाशिक, परभणी येथील उपपीठांमधून हजारो अनु उडयायी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत.

या दिंडीचा उद्देश पर्यावरण जनजागृती असून “ग्लोबल वॉर्मिंग”, प्लास्टिकमुक्ती, झाडे लावा-झाडे वाचवा, स्वच्छता, जलसंधारण अशा विषयांवर फलक व पथनाट्याद्वारे संदेश दिला जात आहे. दिंडीत सहभागी युवायुवतींना विशेष गणवेश देण्यात आले असून शिस्तबद्ध, स्वच्छ व सात्त्विक प्रवासासाठी भोजन, टॉयलेट, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, मुक्काम आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दिंडीमार्गावरील प्रत्येक थांब्यावर हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत असून संपूर्ण प्रवास प्लास्टिकमुक्त ठेवण्यात येतो. या आध्यात्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेतून देहदान, अवयवदान, मोफत शिक्षण, रक्तदान, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता यांसारखी अनेक समाजोपयोगी कामे सातत्याने केली जात आहेत. दिंडी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बाबुराव बागडे, मोहन भोईटे,सचिन घिगे यांनी केले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)