Asia Cup 2025
Asia Cup 2025 Final : भारताकडून पाकिस्तानला चपराक, ऑपरेशन पाकिस्तान यशस्वी
दुबई : क्रिकेट चाहत्यांनी उत्सुकतेने पाहिलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत नववे विजेतेपद पटकावले. दुबईतील या ऐतिहासिक सामन्यानंतर भारतीय संघाने विजयी जल्लोष केला; मात्र ट्रॉफी वितरण सोहळ्यात मोठा वाद उभा राहिला आणि त्याने विजयाचा आनंद काहीसा फिका केला.मात्र सामना संपल्यानंतर खऱ्या खेळापेक्षा ट्रॉफीवरून झालेल्या वादानेच जास्त चर्चेला उधाण आले.भारत विजेता, पण ट्रॉफीवरून वादंग झाले भारताने पाकिस्तानला धडा शिकवत पाकिस्तानी गृहमंत्री व ACC अध्यक्ष मोहसीन नकवीं यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला यामुळे पाकची नाचक्की झाली. तर ACC अध्यक्ष मोहसीन नकवीं नी ट्रॉफी नेल्याचा आरोप माध्यमांनी केला.
भारताचा शानदार विजय
ट्वेंटी-२० स्वरूपात झालेल्या या फायनलमध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत मध्यम धावसंख्या उभारली. भारतीय संघाने (Team India) अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) नाव कोरलंय. तिलक वर्मा (Tilak Verma) भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंहने (Rinku Singh) अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी संयमी खेळी करत पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारताने आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं आणि सलग दुसऱ्यांदा आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला.
ट्रॉफीवरून गोंधळ,पाकला चपराक
सामना संपल्यानंतर साधारण एक तास प्रेझेंटेशन सुरूच होऊ शकले नाही. कारण, भारतीय संघाने एसीसी अध्यक्ष व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसीन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी स्पष्ट नकार दिला.काही वृत्तांनुसार, नकवी यांनीच ट्रॉफी आणि पदके उचलून स्टेजवरून नेल्याचं पाहायला मिळालं.BCCI अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “भारत विजेता असताना ट्रॉफी पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून घेणे योग्य ठरणार नाही.”या दरम्यान मैदानावर गोंधळ उडाला.सामना संपल्यानंतर साधारण एक तास प्रेझेंटेशन सोहळा सुरूच झाला नाही.
कारण असं होतं की, भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एसीसी प्रमुख मोहसीन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.भारताने ठाम भूमिका घेतली की ट्रॉफी त्यांच्याकडून स्वीकारायची नाही.या दरम्यान नकवी यांनीच ट्रॉफी आणि पदके उचलून स्टेजवरून नेल्याचा आरोप भारताच्या माध्यमांनी केला.
भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी वैयक्तिक पारितोषिकं इतर मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. मात्र पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांनी उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. भारतीय संघाने मोहसीन नक्वींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आणि शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. परिणामी मोहसीन नक्वी यांचा चेहरा पडलेला पारितोषिक समारंभात बक्षीस वाटत असताना दिसला.
नेमकं काय घडलं?
एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. भारतातील पहेलगाव आतंकवादी हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान संबध तणाव आहे. या स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले आहे अशावेळी या कारणामुळे भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला.भारतीय संघाच्या ठाम निर्णयामुळे मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी हट्ट करत होते, पण शेवटी भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारली नाही. ट्रॉफी न मिळाल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी आनंद साजरा केला, मात्र मोहसीन नक्वी मैदानातून ट्रॉफी घेऊन निघून गेले. भारतीय संघाच्या या कृतीचे देशभरातून समर्थन होत आहे एकप्रकारे भारतीय संघाने पाकिस्तानला सणसणीत चपराक दिली.
पारितोषिक वितरण सोहळ्यातील परिस्थिती
पारितोषिक वितरण सोहळा सामना संपल्यानंतर तासाभरापेक्षा जास्त उशिरा सुरू झाला.मोहसीन नक्वी व्यासपीठावर एकटेच उपस्थित होते, तर पाकिस्तान संघ जवळजवळ ५५ मिनिटं ड्रेसिंगरूममध्येच राहिला.भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले, फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणं देखील टाळलं.
भारतीय संघाचा अनोखा जल्लोष
ट्रॉफी न मिळाल्यामुळे भारतीय खेळाडूंनी कल्पक मार्ग काढला. त्यांनी मैदानावर “Imaginary Trophy Celebration” केला. खेळाडूंनी हातात नसलेली ट्रॉफी असल्यासारखी पोझ दिली आणि एकमेकांना अभिनंदन केलं. सोशल मीडियावरही खेळाडूंनी ट्रॉफी इमोजी पोस्ट करत पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
कर्णधार सूर्याकुमार यादव म्हणाला, “खऱ्या ट्रॉफीपेक्षा खरी जिद्द आणि खेळ जिंकणं महत्त्वाचं आहे. आम्ही विजेते आहोत आणि तेच सर्वात मोठं पारितोषिक आहे. मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, क्रिकेट फॉलो करायला सुरुवात केल्यापासून असा प्रसंग मी कधीच पाहिलेला नाही की विजेत्या संघाने ट्रॉफी नाकारली आहे. तेही अशी ट्रॉफी जी जिंकण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली आणि सहजासहजी मिळालेली नाही. ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. आम्ही 4 तारखेपासून इथे होतो, सलग दोन उत्कृष्ट सामने खेळलो. मला वाटतं आम्ही यासाठी पात्र होतो. यापेक्षा जास्त काही मी सांगू शकत नाही, कारण मी सगळं एका वाक्यात सांगून टाकलंय. माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे आमच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्व खेळाडू आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ आहेत. हाच तो खरा खजिना आहे, आणि हीच खरी ट्रॉफी आहे, ज्या गोड आठवणींसारख्या माझ्यासोबत कायम राहतील, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.”
पुढे काय?
- BCCI या घटनेमुळे नाराज असून त्यांनी ACC आणि ICC कडे औपचारिक तक्रार करण्याची तयारी दाखवली आहे.
- क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
- चाहत्यांमध्येही सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून “ट्रॉफी पळवून नेण्याची घटना ही खेळाच्या शुद्धतेला तडा देणारी” असल्याची टीका होत आहे.
भारताने सामना जिंकला, पण ट्रॉफीवरून झालेल्या वादामुळे संपूर्ण विजयोत्सव गडबडीत गेला. भारताने सामना जिंकूनही ट्रॉफीवरून झालेल्या वादामुळे संपूर्ण स्पर्धेची शोभा कमी झाली. आता या घटनेवरून BCCI व ACC मध्ये नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहेत.तर या प्रकरणावरून भारत-पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत.
Asia Cup 2025 Final
India vs Pakistan Final
Asia Cup Trophy Controversy
Mohsin Naqvi Trophy Drama
ACC vs BCCI Clash







