Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi: दुचाकीवरून गाठले चंद्रभागा वाळवंट, वारकऱ्यांशी संवाद
Ashadhi Ekadashi भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आवश्यक मुबलक सोयी सुविधांची पाहणी!
Ashadhi Ekadashi पंढरपूर आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून, दर्शनरांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे. पददर्शन रांगेत तसेच पत्राशेड येथे भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासन वतीने आवश्यक मुबलक सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून, या उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी आज पालकमंत्री जयकुमार गोरे केली. आषाढी एकादशी च्या नियोजनासाठी पालकमंत्री ऑन फिल्ड असून नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.
Ashadhi Ekadashi पददर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, तसेच पद दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीकडून करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे केली.
Ashadhi Ekadashi पददर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधताना मंदीर समितीकडून पत्राशेड, दर्शनरांगेत उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधाबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दर्शनरांगेतील भाविकांना मोफत अन्नदान सुरु केले असुन या अन्नदानाचे वाटप करण्यात सहभाग घेतला. वारकरी भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची कमतरता भासणार याची घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.त्याचबरोबर पाहणी करताना वारकरी व भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी टुव्हीलरवरुन दर्शनरांगेची गोपाळपूर पर्यंत पाहणी केली.
Ashadhi Ekadashi यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर प्रशासनाकडून पत्राशेड, दर्शनरांग, दर्शनमंडप, मंदीरात भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबतची माहिती दिली. तसेच दर्शनरांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत पाहणी करताना कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, सांगोला तहसिलदार संतोष कणसे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर उपस्थित होते.






