Akshaye Khanna Dhurandhar
Akshaye Khanna Dhurandhar Movie छावा पाठोपाठ धुरंदर ही ठरला ब्लॉकबस्टर सिनेमा, ऐन पन्नाशीत अक्षयचा तगडा कम बॅक
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला असून, या चित्रपटातील अक्षय खन्ना यांचा अभिनय सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत कोट्यवधींचा गल्ला जमवत २०० कोटीच्या टप्प्याकडे यशस्वी घोडदौड सुरु आहे.Dhurandhar movie box office collection update या यशामागे जितका भक्कम दिग्दर्शनाचा वाटा आहे, तितकाच मोठा वाटा अभिनेता अक्षय खन्नाच्या दमदार अभिनयाचाही मानला जात आहे.Akshaye Khanna Dhurandhar Movie
धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने साकारलेली ‘रहमान डकैत’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवणारी ठरली आहे. थंड डोक्याचा, रणनीती आखणारा आणि भीषण प्रभाव टाकणारा हा व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने इतक्या सहजतेने साकारली आहे की प्रत्येक सीनमध्ये तो वेगळ्याच पातळीवर उठून दिसतो. विशेष म्हणजे एका महत्त्वाच्या सीनसाठी अक्षय खन्नाला प्रत्यक्षात अनेक वेळा थप्पड बसली होती, मात्र कोणतीही तक्रार न करता त्यांनी सीन परफेक्ट होईपर्यंत सर्व रीटेक्स दिले. तसेच सिनेमातील लदाख मधील चित्रित सीन मध्ये श्वसनाचा त्रास सहन करीत कणखर अभिनयाची छाप सोडली या गोष्टीने चाहत्यांमध्ये त्यांच्या प्रोफेशनॅलिझमची अधिकच चर्चा सुरू झाली आहे.Dhurandhar movie review Marathi news
सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या अभिनयाचं तुफान कौतुक होत आहे. Dhurandhar movie Akshaye Khanna performance अनेक प्रेक्षकांनी त्यांचा अभिनय इतर प्रमुख कलाकारांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं म्हटलं असून, काहींनी तर थेट “हा अभिनय पुरस्कारांसाठी पात्र आहे” अशी मागणी केली आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर ‘धुरंधर म्हणजे अक्षय खन्ना शो’ अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही अक्षय खन्नाच्या कामगिरीचं खुलेपणाने कौतुक केल्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे.
सिनेमा मधील “FA9La” गाणं आणि अक्षयच्या एंट्री सीनच्या संगीताने सोशल मीडिया आणि YouTube वर ट्रेंडिंगची स्थिती मिळवली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांच्या फॅनक्लबने तिचं स्वागत मोठ्या प्रमाणात केलं आहे. तर त्याच्या डान्स स्टेप सध्या सर्वत्र तुफान लोकप्रिय झाल्या आहेत. Akshay Khanna best role in Dhurandhar
बॉक्स ऑफिसवरही धुरंधरची घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाही. दुसऱ्या वीकेंडलाही सिनेमाने जबरदस्त कमाई करत मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. सिनेमातील अक्षय खन्नाचा एंट्री सीन, पार्श्वसंगीत आणि गाणी सध्या सोशल मीडिया व यूट्यूबवर ट्रेंड करत असून, चाहत्यांकडून या सीनना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाच्या करिअरला नवी दिशा मिळाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. Akshaye Khanna upcoming movies 2026 आगामी काळात त्यांच्याकडे अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स आल्या असून, 2026 हे वर्ष अक्षय खन्नासाठी विशेष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगोदर छावा यानंतर धुरंधरच्या यशामुळे अक्षय खन्नाकडे सिनेमा प्रोजेक्ट्ची रांग लागली आहे, गाजावाजा न करता केवळ अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा कलाकार म्हणून अक्षय खन्नाने पुन्हा एकदा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
एकूणच, धुरंधर हा सिनेमा केवळ अॅक्शन किंवा थरारापुरता मर्यादित न राहता, अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
Dhurandhar Movie, Akshaye Khanna Dhurandhar, Dhurandhar Box Office, Akshaye Khanna Rahman Dacait, Dhurandhar Movie Review Marathi, धुरंधर सिनेमा, अक्षय खन्ना धुरंधर, रहमान डकैत भूमिका, धुरंधर बॉक्स ऑफिस कमाई, अक्षय खन्ना अभिनय कौतुक, आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर,







