Ai Drone Camera ची नजर, मोजली वारीतील गर्दी

Ai Drone Camera ची नजर, मोजली वारीतील गर्दी

Pune Police वापरात आहेत आधुनिक Ai Drone Camera

सध्या आषाढी वारी सुरु असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळे पंढरपूरकडे निघाले आहेत अशावेळी या सोहळ्यामध्ये राज्यातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस या भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असून यावेळी Ai Drone Camera ची नजर संपूर्ण पालखी सोहळ्यावरती राहत आहे. केवळ गर्दीचे चित्रीकरण आंही तर त्यासोबत वारीतील गर्दी मोजण्याचे काम हे Ai Drone Camera चोख करीत आहेत.

पालखी सोहळे पंढरीकडे निघालेले असताना दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून बदलत्या Technology मुळे वारी घरबसल्या जगभरातील भाविक अनुभवत आहेत अशावेळी Drone Camera तुन चित्रीकरण करण्यासाठी वापर वाढला त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने Drone Camera वापरात आणत वारीतील गर्दीवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूने उपयोग सुरु केला यामुळे Drone Camera Technology हि अशा सोहळ्यात उपयोगी ठरली

आता Technology देखील झपाट्याने बदलत असून दिवसेंदिवस आधुनिक होत आहे Ai Technology च्या आविष्काराने कमाल केली असून दैनंदिन जीवनात Ai चा वापर भविष्यात वाढणार आहे . अशावेळी पुणे पोलिसांनी यंदा वारीच्या नियोजनासाठी Ai Technology ची मदत घेतली त्यांनी पहिल्यांदाच Ai Drone Camera Technology वापरली असून यामुळे वारीतील गर्दीचे अचूक विश्लेषण करणे व नियोजन करणे सुलभ झाले आहे.

वारीच्या नियोजनासाठी पोलिसांचा पारंपरिक पद्धतीने पालखी मार्गावर चोख बंदोबत असतो, पालखी सोबत संपूर्ण सोहळ्यात अधिकारी, शिपाई व सध्या गणवेशातील कर्मचारी करडी नजर ठेवून तैनात असतात. त्यांच्या मदतीला Pune Police यांनी Ai Drone Camera जोड दिली असून यामुळे गर्दीचे अचूक विश्लेषण Real Time Data मिळत असून पालखी मार्गावरील वाहतूक, मुक्काम येथील बंदोबस्त चोख करण्यासाठी होत आहे .

यंदा पोलिसांनी वापरलेल्या Ai Drone Camera मुले गर्दीची योग्य माहिती पोलिसाना प्राप्त झाली त्यानुसार दोन्ही पालखी सोहळे पुण्यात असताना Ai Drone Camera माध्यमातून गर्दी मोजली त्यानुसार तब्बल ४ लाख ९० हजार वारकरी यामध्ये सहभागी झाल्याचे माहितीवरून समोर आले. संत तुकाराम महाराज पालखी सोबत १ लाख ९५ हजार वारकरी व ६०० वाहने तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत २ लाख ९५ हजार वारकरी आणि १ ८ ० ० वाहने सहभागी झाल्याचे माहितीत नोंद झाले. यामुळे Ai Drone Camera पुणे पोलिसांसाठी आणि वारीसाठी मदतीचा ठरत आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)