Dance festival :आनंद मेळाव्यातून भावी गुणवंत कलाकार घडतील- प्रियाताई शिंदे

Dance festival :आनंद मेळाव्यातून भावी गुणवंत कलाकार घडतील- प्रियाताई शिंदे

Dance festival : देऊर येथे पिंपोडे खुर्द केंद्राचा बाळ आनंद मेळावा उत्साहात

Dance festival : प्रत्येक विद्यार्थांच्यामध्ये एक सुप्त कलागुण दडलेला असतो, शिक्षकांनी तो हेरून प्रोत्साहन दिले तर विदयार्थी या संधीचे सोने करतील त्यासाठी शिक्षण विभागाने आयोजित केलेले बाल आनंद मेळावे पूरक आणि पोषक ठरतील. या मेळाव्यातून विद्यार्थी आपले कलागुण विकसित करतील यातूनच देशासाठी भावी गुणवंत कलाकार घडतील असे गौरवोद्गार प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केले.

देऊर (ता . कोरेगाव ) येथील श्री मुधाईदेवी मंगल कार्यालयात पंचायत समिती कोरेगाव शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित पिंपोडे खुर्द केंद्राचा बाळ आनंद मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, केंद्रप्रमुख शिवाजीराव तावरे, श्री मुधाईदेवी विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप ढाणे, किरण फाळके, तरुण भारतचे पत्रकार प्रकाश राजे, प्रमोद देशमुख, आयुब खलिफा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे म्हणाले, पिंपोडे खुर्द केंद्रातील विद्यार्थ्यांनी सातत्याने गुणवत्तेसोबत सर्वोत्तम कामगिरी केली आहे या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थी गुणवत्ता दाखवत आहेत हि कौतुकाची बाब आहे . शासन व शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून यामध्ये शिक्षक व पालक यांनी योगदान द्यावे .

प्रास्ताविक करताना पिंपोडे केंद्रप्रमुख शिवाजीराव तावरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून येण्याचे काम शासनाने केले आहे त्याला केंद्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मेहनत घेऊन सर्वोत्तम सादरीकरण करुन सार्थ कामगिरी केली आहे. सर्वांच्या सहकार्यातून पिंपोडे केंद्र नेहमीच गुणवत्ता आणि गुणवंत या दोन्ही पातळीवर आघाडीवर राहील.
मेळावा यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख शिवाजीराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संजय सावंत, संतोष राजे, देवानंद रणदिवे आणि पिंपोडे खुर्द केंद्रातील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ किरण भांडवलकर, संतोष चव्हाण सर यांनी केले तर अविनाश निकम यांनी आभार मानले.

netsoft computer
netsoft computer

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू