ज्ञानेश्वरी पारायण सोहळे समाजपरिवर्तनाचे व्यासपीठ : ह.भ. प.सुरेश उर्फ सोन्ना महाराज

ज्ञानेश्वरी पारायण सोहळे समाजपरिवर्तनाचे व्यासपीठ : ह.भ. प.सुरेश उर्फ सोन्ना महाराज

56 व्या वर्षातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा श्री क्षेत्र देऊर येथे थाटात शुभारंभ

प्रकाश राजे/सातारा
ग्रामीण भागात सलग 56 वर्ष संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या ग्रंथाचे वाचन प्रबोधन प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून जोपासण्याचे काम देऊर मधील पारायण मंडळ करत आहे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी पारायण सोहळे हे समाजपरिवर्तनाचे व्यासपीठ असल्याची भावना समर्थ रामदास स्वामी संस्थानचे ह.भ. प.सुरेश उर्फ सोन्ना महाराज यांनी व्यक्त केल्या.

IMG 20250130 WA0019

श्री क्षेत्र देऊर (तालुका कोरेगाव) येथील अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या चा शुभारंभ आज गुरुवारी दि 30 जाने रोजी ह.भ.प सुरेश उर्फ सोन्ना महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व आळंदी येथील ह.भ.प निर्मलनाथ महाराज, सातारा येथील ह.भ.प उद्योजक बाफना शेठ, देऊर विकास सेवा सोसायटी चेअरमन धनसिंग कद, देऊर गावाचे सरपंच शामराव कदम, पोलीस पाटील अजित कदम, ह.भ.प मोहन नाना कदम, ह.भ.प प्रल्हाद रनवरे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
या सोहळ्याचा आज विधिवत टाळ, पखवाज, वीणा पूजन करून सकाळी प्रारंभ झाला या सोहळ्यात ह.भ.प कबीर महाराज आतार, ह.भ.प नवनाथ महाराज लिमण, ह.भ.प योगेश महाराज यादव, ह.भ.प अमोल महाराज सूळ, ह.भ.प माऊली महाराज पठाडे, ह.भ.प. नीलेश महाराज कोरडे, ह.भ.प मधुकर महाराज सायाळकर. ह.भ.प नवनाथ महाराज गोगावले या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची किर्तन सेवा होणार आहे.

पुरातन विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात किर्तन सोहळा,

देऊर येथील पुरातन विठ्ठल मंदिर हे आपल्या हेमांडपंथी स्थापत्थशैलीच्या देखण्या वास्तुकलेमुळे प्रसिद्ध आहे. यावरील कोरीव शिल्पकला पाहण्यासाठी भाविक व पर्यटक गर्दी करतात. या मंदिराच्या प्रांगणात तालुक्यातील हिरक महोत्सवाकडे वाटचाल करणारा किर्तन सोहळा होत असून विठ्ठल मंदिराची राज्यातील नामवंत कीर्तनकारांनाही भुरळ पडत आहे अशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा भाविक करीत आहेत.

IMG 20250122 WA0012

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू